अहिल्यादेवी होळकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी १० लाख निधी
आ. कैलास पाटील यांचे धनगर समाज बांधवानी मानले आभार
Tue, 10 Aug 2021

उस्मानाबाद : शहरातील आयुर्वेद महाविद्यालयासमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार कैलास पाटील यांनी आमदार निधीतून 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असून त्या बाबतचे पत्र त्यांनी समाजातील कार्यकर्त्यांना प्रदान केले.
यावेळी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमनाथ लांडगे सर, सचिव प्रा.मनोज डोलारे सर, इंद्रजित (भैय्या) देवकते, डॉ. संतोष पाटील, लिंबराज (दादा) डुकरे, संतोष डुकरे, मेजर अशोक गाडेकर, सचिन (भैया) शेंडगे, विजय कुमार शेंडगे, महावीर काकडे, धनंजय काळे, सागर दाणे, नरसिंह मेटकरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
हा निधी दिल्याबद्दल धनगर समाज बांधवांनी आमदार कैलास दादा पाटील यांचे आभार मानले आहेत.