उस्मानाबाद जिल्ह्यातील एकीकडे शेतकरी पिकविमा लाभापासून वंचित

  • चालु वर्षी पिके करपून गेलीत....
  • आणि शिवसेनेचे खासदार चिखलफेक करण्याची मजा घेत आहेत...
 
s

खरीप २०२० चा पिकविमा अजुन मिळालेला नाही, गतवर्षीच्या प्रचंड पावसाने शेतजमिनी खरवडून गेल्या त्यात शेकडोंच्या संख्येत शेतकरी अक्षरशः उद्धवस्त झाले,यासर्व दुर्घटना घडत असताना शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे केले मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जो पाठपुरावा जिल्ह्यातील शिवसेना खासदार किंवा अन्य सत्ताधाऱ्यांनी करणे अपेक्षित होते ते झालाच नाही परिणामी उद्धवस्त शेतकऱ्यांना संताप यावा अशी तुटपुंजी मदत मिळाली.

भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना .देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कोणत्या तरी स्वरूपात दर ठराविक महिन्याच्या अंतराने आर्थिक मदत करण्याचे धोरण ठेवले होते, त्यापैकीच एक महत्त्वाचा विषय पिकविमा हा होता, मात्र गेल्या 2 वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही किंवा जो मिळाला तो समाधानकारक नव्हता....याचे कारण सुद्धा जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे असलेले दुर्लक्ष हेच आहे.

मागच्या 6 महिन्यात .आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, दुष्काळ, पर्जन्यमान याबाबत अभ्यासपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पिकविमा भरपाई मिळायच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, मा.आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून पिकविमा मिळणार अशा बातम्या अनेक वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या या बातम्यांचा त्रास होऊन पोटशूळ उठलेले शिवसेना पदाधिकारी भ्रामक मुद्यांचा आधार घेत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यावर व्यर्थ आगपाखड करत आहेत.

जिल्ह्यातील कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी गुत्तेदारीच्या कामात तीव्र इच्छुक असतात? अधिकाऱ्यांच्या करवी मोठ्या टेंडर्समध्ये कोण आडकाठी आणतो, कोण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना अक्षरशः शिव्या घालत स्वतःच्या व्यावसायिक संस्थांना लाभ पोहचवणारे निर्णय घ्यायला भाग पाडतो हे नव्याने सांगण्याची गरजच नाही...किंवा त्यातुन कोणाला किती कमिशनसाठी सेटलमेंट होते हेसुद्धा लपून राहिलेले नाही.

नितीन काळे यांची राजकीय उपयोगिता :

कोण कोणाचा मालक आहे कोण भुंकतो? कोण कुत्रे भुंकायच्या रात्री अपरात्रीच्या वेळेस चोरटे व्यवसाय करतो? त्यावर पांघरूण कोण घालतो हेसुद्धा जिल्ह्यातील सर्व टेम्पो चालकांसह सर्वांनाच माहिती आहे, किंबहुना याबाबतचे दाखल झालेले गुन्हे सर्वश्रुत आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे हे उच्चशिक्षित म्हणजेच अभियांत्रीकी अभ्यासक्रम पुर्ण केलेले प्रथितयश व्यावसायिक आहेत, अर्धवट शिक्षण सोडुन पळ काढलेले नाहीत. सर्व सामान्य जनतेसाठी केलेले काम व संघटन कौशल्य यातुन त्यांची राजकीय उपयुक्तता निर्माण झाली त्यामुळेच की काय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी मा.काळे साहेबांच्या 48 सभा बैठका घेऊन स्वतःचा विजय सोपा केला होता.

अखेरीस उरतो विषय की नितीन काळे यांनी निवडून येण्याचा तर धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत त्यांचे जनमानसात असलेले स्थान सगळ्यांनाच समजले आहे, मात्र केवळ  मोदींची लोकप्रियता आणि भाजपा कार्यकर्त्यांनी दारोदार जाऊन मिळवलेले मतदान या बळावर शिवसेनेचे उमेदवार लोकसभेत गेलेले आहेत हे विसरू नये. जर स्वतःच्या बाबतीत लोकप्रियतेचा कळस गाठलाय हा गैरसमज गडद होत असेल तर एकदा राजीनामा द्यावा अन पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची खरी विश्वासार्हता समजून येईल.

तुम्ही कितीही सज्जनतेचा आव आणला तरी शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला कोणीही शेतकरी घेणार नाही कारण यासाठी सगळे प्रयत्न मा.राणाजगजितसिंह पाटील हे करताना जिल्हावासीय बघत आहेत आणि भाजपाचे नेते नितीन काळे स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेवर व्यवसाय करून नैतिक मार्गाने चार पैसे मिळवतात त्यामुळे त्यांना बदनामीची भीती नाही.....बाकी जे लोक चिखलफेक करत आहेत त्यांनी फेकलेला चिखल भाजपा नेत्यांपर्यंत पोहचणार नाहीच परंतू तुमचे हात व तुमचे सर्वांग चिखलाने माखलेले आहे याची चिंता करावी.

-  पांडूरंग (अण्णा) पवार 
भाजपा जिल्हा बुध्दीजिवी प्रकोष्ठ
संयोजक, धाराशिव (उस्मानाबाद)

From around the web