बेंबळीचा लाचखोर पोलीस तडकाफडकी निलंबित 

उस्मानाबाद लाइव्हचा दणका 
 

उस्मानाबाद - तुळजापूर - औसा या चार पदरी महामार्गावर उजनी फाट्याजवळ बेंबळी पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी वाहने आडवून त्यांच्याकडून राजरोस पैसे उकळत होता. त्याची बातमी उस्मानाबाद लाइव्हने व्हिडिओसह प्रसिद्ध करताच या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस अधीक्षक राजतिलक  रौशन यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. 

सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून नियमानुसार दंड आकारून पावती दिली तर कुणाची तक्रार नाही, पण पावती न देता ते पैसे खिशात घालणे, ही  लूटच म्हणावी लागेल. 

तुळजापूर - औसा या चार पदरी महामार्गावर उजनी फाट्याजवळ बेंबळी पोलिसांनी  मंडप मारून वाहन चालकाची लूट सुरु केली होती. त्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला होता. या व्हिडीओ मधील पोलीस कर्मचारी नेताजी जगताप हा इतर पोलिसांना म्हणतो, मी कसं २०० घेतो. जास्त मागायचे आणि जेवढे देईल तेवढे घ्यायचे ...  तुम्हाला  कसं  ड्युटी करताना इंटरेस्ट येईना....  


ही  बातमी उस्मानाबाद लाइव्हने बुधवारी प्रसिद्ध करताच,  पोलीस कर्मचारी नेताजी जगताप यास पोलीस अधीक्षक  राजतिलक  रौशन तडकाफडकी निलंबित केले आणि चौकशी सुरु केली आहे. 

बेंबळी पोलिसांकडून वाहन चालकांची लूट ( व्हिडीओ )

व्हिडीओ पाहा