उस्मानाबाद जिल्ह्यात आजपासून ९ दिवसाचा जनता कर्फ्यू
बॅकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरु राहणार
Updated: May 15, 2021, 17:33 IST
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक १५ ते २४ मे दरम्यान ९ दिवसांचा पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
या अगोदर जनता कर्फ्यू दिवशी बॅक सेवा ग्राहकांसाठी बंद होत्या. यामुळे ग्राहकांच्या सुविधांवर मर्यादा आल्या होत्या.याबाबत व्यापारी तसेच बॅक ग्राहकांनी आपल्या अडचणी आमदार कैलास पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी पूर्वीप्रमाणेच ग्राहकांसाठी बॅकेचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ठेवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. दुपारनंतर बॅकेचे फक्त अंतर्गत कामकाज सुरु राहणार आहे.
या आदेशामुळे पेट्रोलपंप चालक,गॅस एजन्सीज,मेडिकल दुकानदारांसह अनेकांची गैरसोय दूर झाली आहे.
जनता कर्फ्यूची सविस्तर बातमी वाचा