संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाधीला चंदन उटी
May 19, 2020, 15:30 IST
तेर - चंदनाचे हात पाय ही चंदन I असे म्हणत उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार समाधीला चंदन उटी लावून सुरेख मुर्ती साकारण्यात आली . यातुनही नागरीकांना कोरोना विरुध्दच्या लढ्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला
वैशाख वैद्य द्वादशीला संतश्रेष्ठ गोरोबा काकांची उटी वारी .भगवान परमात्म्यासह संताची उन्हाळ्यातील उन्हाची दाहकता कमी व्हावी यासाठी गुणाने शितल आसलेल्या चंदनाची उटीचा लेप लावण्यात येतो .अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी पासुन म्हणजे जवळपास तीन आठवडे उगाळलेल्या चंदनापासून उटीचा लेप लावलेली अकर्षक मुर्ती उभा केली जाते .
प्रती वर्षी उत्साहात गरुड , मोर , वाघ , हत्ती आदी वर स्वार असलेली मुर्ती बनवली जाते मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व बंद असलेली मंदिरे लक्षात घेऊन मुख्य पुजारी ह.भ. प. रघुनंदन पुजारी महाराज यांनी जनतेला संदेश जावा यासाठी,
ठाईच बैसुनी करा एक चित्त I
आवडी अनंत आळवावा ॥
म्हणजे घरातच बसुन एक चित्त करत भगवान परम्यात्म्याचे नामस्मरण करावे असा संदेश देणारी पायांची मांडी घालुन भजन - नामस्मरण करत असलेली गोरोबा काकांची मुर्ती साकारलीली होती .
पाहा व्हिडीओ