उस्मानाबाद लाइव्हची गरुडझेप !

जे नवं, ते आम्हाला हवं !
 

बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळ जसा बदलत आहे तसे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. मीडियात सुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. एकेकाळी प्रिंट मीडियाचा दबदबा होता, नंतर इलेक्ट्रॉनिक ( टीव्ही ) मीडियाचा दबदबा निर्माण झाला आणि आता वेब तथा  डिजिटल मीडियाची चलती आहे.कोरोना लॉकडाऊन काळात वेब तथा डिजिटल मीडियाला चांगले दिवस आले आहेत.  

महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाडयात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या मागास जिल्ह्यातून दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१०-११ मध्ये उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल सुरु केले. त्यावेळी २ जी इंटरनेट स्पीड होती. आजकालसारखे स्मार्ट फोन  नव्हते. वेबसाइट फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर दिसत होती. वाचक जेमतेम होता. लोकांना इंटरनेट म्हणजे काय ? हे माहीत नव्हते. तरीही आम्ही हे धाडस केले होते. नंतर ३ जी इंटरनेट स्पीड सुरु झाली. स्मार्ट फोन बाजारात आले आणि उस्मानाबाद लाइव्ह दिवसेंदिवस लोकप्रिय होवू  लागले. तीन वर्षांपूर्वी ४ जी सुरु झाले आणि नवनवीन स्मार्ट फोन आल्यामुळे उस्मानाबाद लाइव्हच्या वाचक वर्गामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख आहे. पैकी पाच लाख लोकांकडे स्मार्ट फोन आहे.या सर्व स्मार्ट फोनवर उस्मानाबाद लाइव्ह झळकू लागले आहे. उस्मानाबाद लाइव्हचे वाचक फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातच नव्हे तर पुणे, मुंबई, संपूर्ण  मराठवाडा, देश- विदेशात आहेत. जिथे उस्मानाबादकर आहेत, तिथे उस्मानाबाद लाइव्ह सोबत आहे. आजमितीस उस्मानाबाद लाइव्हची वाचकसंख्या दर दिवशी किमान पाच लाख नोंदवली जात आहे. निर्भीड, निष्पक्ष, सडेतोड हा आमचा बाणा आहे. तो बाणा आम्ही कधीही म्यान  केला नाही. त्यामुळे उस्मानाबाद लाइव्हवर वाचकांचा प्रचंड विश्वास आहे.

उस्मानाबाद लाइव्हची वेबसाइट पूर्वी एचटीएमएल (HTML)  नंतर वर्डप्रेस, नंतर  ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर सुरु होती.  वेबसाईट एका क्लिकवर जलदगतीने ओपन व्हावी, युझर फ्रेंडली असावी हा  विचार आम्ही नेहमीच केला आहे. तसेच दर दोन वर्षांनी वेबसाईटचा लूक चेंज केलेला आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही वेबसाइट सुरु केली होती, त्यावेळी काही सहकारी पत्रकार मित्र पाठीमागे याची वेबसाइट कोण वाचतो म्हणून हिणवत होते. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेतले नाही. त्यामुळे ते आता प्रवाहाबाहेर पडले आहेत. काहीनी आता सुरुवात केली आहे. पण आम्ही दहा वर्षांपूर्वी सुरुवात केल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद लाइव्ह नंबर १ आहे.वेबसाइट, ऍप, युट्युब, फेसबुक पेज या  माध्यमातून सर्वात जलद गतीने बातम्या देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

सध्या  डिजिटल मीडियात मोठी क्रांती झाली आहे.काळाबरोबर  डिजिटल मीडियाचे प्लॅटफॉर्म बदलत आहेत. जे नवं ते आम्हाला हवं असतं. आता आम्ही पुन्हा नवा प्लॅटफॉर्म निवडला आहे. अनेक कंपन्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात उतरल्या आहेत. टाइम्स ग्रुपने कोलंबिया ( M 360 ) नावाची डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. या कंपनीबरोबर उस्मानाबाद लाइव्हने व्यावसायिक करार केला आहे. त्यामुळे उस्मानाबाद लाइव्हची वेबसाइट टाइम्स ग्रुपने स्वत: डेव्हलप केलेल्या प्लॅटफॉर्मवर सुरु झाली आहे.कोलंबिया ( M 360 )  कंपनी उस्मानाबाद लाइव्हला सर्व टेक्निकल सपोर्ट तर करणार आहेच पण जाहिरात व्यवसाय देणार आहे. ही  कंपनी वेळोवेळी विविध टूल्स  तयार करून देणार आहे.  त्यामुळे मोठ्या  वृत्तपत्र समूहाच्या तोडीस तोड उस्मानाबाद लाइव्हची वेबसाईट दिसणार आहे.

आम्ही आजवर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बातम्या दिल्या आहेत. आमच्याकडे कंटेंट आहे. आता टाइम्स ग्रुपच्या कंपनीचा  टेक्निकल सपोर्ट मिळणार असल्यामुळे   उस्मानाबाद लाइव्ह अधिक लोकप्रिय आणि सशक्त होण्यास मदत होणार आहे. आपल्या देशात लवकरच 5 G  इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. त्याच स्पीडने उस्मानाबाद लाइव्ह ओपन होणार आहे. तसेच ही  वेबसाईट अधिक युझर फ्रेंडली असणार आहे.

उस्मानाबाद लाइव्हचा नवा लूक आमच्या वाचकांना तो नक्की पसंद पडेल, अशी अपेक्षा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांनी भरभरून प्रेम दिले. अनेकांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्यामुळे उस्मानाबाद लाइव्ह  लोकप्रिय झाले. असेच प्रेम, सदिच्छा आणि सहकार्य कायम राहील, अशी अपेक्षा आहे.  तेव्हा वाचत राहा - उस्मानाबाद लाइव्ह.

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.com