लवकर नोकरी मिळवण्यास पुरुष ‘महिलांची पारंपारिक कामे’ स्विकारतील

 

   आपल्या एका संशोधनाच्या आधारे जेड म्हणतात की, येत्या काळात रोबोटिक्स ऑटोमेशन आणि पारंपारिक रोजगारामध्ये होणाऱ्या बदलांच्या कारणाने नोकर्‍या सहजपणे उपलब्ध होणार नाहीत. आणि याचा सर्वाधिक त्रास कमी शिकलेल्या पुरुषांना होणार आहे. अशा परिस्थितीत ते उपजीविकेचा आधार म्हणून अशा कामांचा विचार करतील की जी कामे सामान्यपणे स्त्रियाच करत आल्या आहेत. येणाऱ्या काळात आरोग्य सेवांसारख्या नोकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे कारण त्यावर स्त्रियांचे वर्चस्व आहे. जेड असेही म्हणतात की, महिलाबहुल रोजगार क्षेत्रात सामान्य कामांपेक्षा दुप्पट वाढ होण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेसह जगभरातील सर्वच देशांमध्ये नोकरीमध्ये, कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष भेदभावाचे प्राबल्य आहे. अमेरिकेच्या जनगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण करून जेडचा अंदाज आहे की, अमेरिकेच्या एक तृतीयांशपेक्षाही कमी महिला अशा ठिकाणी काम करतात जिकडे ऐंशी टक्के कर्मचारी हे पुरुषच असतात.

अलिकडच्या दशकांत यांत्रिकीकरणामुळे पुरुषांच्या नोकर्‍यांवर संकट ओढवलेले आहे. ऑटोमेशन तंत्रज्ञानामध्ये वाढती कृषी आणि उत्पादन क्षेत्रात कमी कामगार असूनही जास्त उत्पादन सुलभपणे मिळविले जात आहे. त्याच वेळी आर्थिक मंदी आणि व्यापार युद्धामुळेयूएस अर्थव्यवस्थेने सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नोक ऱ्यांमध्ये मोठे बदल केलेले आहेत, कारण त्यामध्ये माणसांऐवजी मशीन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापरण करणे अधिक सोपे झाले आहे.


कमी शिकलेल्यांना पुरुषांप्रमाणे काम

  अशी परिस्थिती बहुतेकरून कमी शिक्षित  पुरुषांना आव्हानात्मक ठरली जाईल कारण पर्याय नसल्यामुळे अशा लोकांना केवळ पुरुषांशी संबंधित क्षेत्रातच  रोजगार शोधावा लागेल. आज  अमेरिकेत हायस्कूलपर्यंत शिक्षण घेणारे 80 टक्के पुरुष हे  प्राथमिक नोकरी किंवा द्वितीय श्रेणीच्या  नोकरीमध्येच  आपले आयुष्य घालवताना  दिसत आहेत.म्हणून चांगल्या नोकरीसाठी आता पूर्वीपेक्षाही  चांगले शिक्षण महत्त्वाचे होणार आहे. व्यवसायाची  पदवी असलेले किंवा पदवीधर झालेल्या अमेरिकन पुरुषांपैकी  ऐंशी टक्के लोक हे  उच्च-उत्पन्नाच्या  नोकरीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे स्त्रियांनाही असाच नियम लागू पडणार आहे. नोकरीतील  लैंगिक भेदभावापेक्षा आता लिंग-आधारित रोजगाराचे महत्त्व वाढणार असल्याचे जेड  यांचे म्हणणे आहे.

 महिलांनाही आव्हान

  जेड म्हणाले की ऑटोमेशनमुळे पारंपारिकपणे काही महिलांच्या नोकर्‍याही धोक्यात आल्या आहेत. ऑटोमेशनमुळे टेलिफोन ऑपरेटरकापड कामगार आणि ट्रॅव्हल एजंट्स सारख्या सर्व महिलाबहुल क्षेत्रात महिलांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचे एक कारण म्हणजे आता मल्टी-टास्किंग आणि अधिक कुशल कर्मचार्‍यांची गरज निर्माण होणार आहे.
पुरुषांपेक्षा महिलांनी स्वत: ला अधिक शिक्षित व प्रगत केले आहे जेणेकरून त्यांना हव्या त्या नोकऱ्या त्या स्वीकारू शकतात, काम करू शकतात. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या रुग्णवाहिका चालकआपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञवैयक्तिक वित्त सल्लागारवेब विकसकसंगणक शास्त्रज्ञ, कार्यवाहक या क्षेत्रात आणखी  विस्तार अपेक्षित आहे. परंतु अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि सेवांकडे होणारा व्यापक कल पाहताइतर अमेरिकन पुरुषांना, असे करण्याची इच्छा असेल तर येत्या काही वर्षांत महिलांच्या पारंपारिक भूमिकेत जाण्याची आवश्यकता असू शकते.