साहेब की दादा ? धाराशिव जिल्ह्यातील पिक्चर क्लियर ...
धाराशिव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर धाराशिवमध्ये 'साहेब आणि दादा' असे दोन गट पडले आहेत.तसेच कोण कोणत्या गटात आहे असा संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र मुंबईत आज झालेल्या मेळाव्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कोण कोणत्या गटात आहेत, हे स्पष्ट झाले नव्हते , आज मात्र पिक्चर क्लियर झाले आहे.
साहेब गट
जीवनराव गोरे (माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद )
राहुल मोटे ( माजी आमदार )
संजय पाटील दुधगावकर ( कार्याध्यक्ष )
संजय निंबाळकर ( प्रदेश कार्यकारिणी सदस्य )
सक्षणा सलगर ( युवती अध्यक्ष )
मसूद शेख ( प्रदेश सचिव )
रोहित बागल
दादा गट
आ. विक्रम काळे
आ. सतीश चव्हाण
सुरेश बिराजदार कुंपणावर
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार सध्या कुंपणावर आहेत, त्यांचे तळ्यात- मळ्यात सुरु आहे. आज मुंबईत झालेल्या दोन्ही मेळाव्याला ते हजर होते.दादाचे भाषण ऐकून आपण साहेबाच्या भाषणाला गेल्याचे सांगून , दोन दिवसांत चर्चा करून आपला निर्णय सांगू असे बिराजदार म्हणाले. .