धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधगावकरांनी १०० लिटर दूध सांडले 

दुधाला हमी मिळावा म्हणून आंदोलन 
 

धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतुत्वाखाली दुधाला हमी भाव मिळावा , या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर १०० लिटर दूध सांडून राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध  मागण्यांचे निवेदन देण्यात आले़,  या  निवेदनात म्हटले की, उन्हाळ्यामध्ये दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांना चांगली मागणी  असतानाही मागील एक महिन्यांमध्ये दुधाच्या दरामध्ये लिटरमागे ५ रुपयाची घसरण झालेली आहे. मागील तीन महिन्यापूर्वी गाईच्या दुधाची किंमत ३८ रुपये प्रति लिटर होती. ती आज ३३ रुपये झाली आहे. अगोदरच उन्हामुळे व लंपी आजाराच्या अनुवंशिकतेमुळे दुधाचे उत्पादन घटले आहे. चाऱ्याच्या किंमती व पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत. यातच दुधाचे दर घसरल्यामुळे शेतीला पूरक उद्योग असणारा दुग्ध व्यवसाय हा अडचणीत येऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दूध दर कपात न करता पूर्वीप्रमाणेच दुधाचे दर ठेवावेत, दुधाला हमीभाव मिळावा यासाठी एफआरपी कायदा करावा,

 शेतकऱ्याना खरीप पिककर्ज त्वरित वाटप करावे, पिककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, सततच्या पावसाचे रुपये २२२ कोटीचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित वाटप करावे, सन २०२२ या पिकविमा शेतकऱ्यांना  त्वरित द्यावा, महात्मा फुले पीक कर्ज योजनेचे ५० हजार अनुदान पात्र शेतकऱ्यांना त्वरीत वाटप करावे, ६ हजार कांदा उत्पादक शेतकºयांचे अनुदान त्वरित मंजूर करून वाटप करावे, शासनाने हमी खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या हरभऱ्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना  वाटप करावी, 

टेंभुर्णी -लातूर महामागार्चे चौपदरीकरण मंजूर करून काम त्वरित चालू करावे, पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याचे काम पूर्ण करावे, येडेश्वरी मंदिर ते बार्शी रोड ३.५ किमी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित मंजूर करून काम चालू करावे, वीज दरवाढ रद्द करावी, मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात मोहन लोमटे, गणेश गडकर, प्रा विलास जगताप, भारत शिंदे, सागर चिंचकर, रमेश गादेकर, अरुण पवार, किरण मस्के, बाळासाहेब पाटील, उत्तरेश्वर धाबेकर, एकनाथ शेळके, विलास पवार, मदन पवार, राजपाल दूधभाते, गणपत चव्हाण, सोमनाथ उंबरे, महादेव शेंडगे, नामदेव चव्हाण, बालाजी डोंगे, इकबाल पटेल, अनिल जाधव, औदुंबर धोंगडे, दीपक माळी, गोरख चव्हाण, रणजीत वर्पे, विक्रम सावंत, संतोष थोरवे, शिवाजी चव्हाण, श्रीकृष्ण होगले, परमेश्वर मिसाळ, जगदीश कवडे, विलास अडसूळ, अरुण गायकवाड, राहुल हाजगुडे, अनिकेत कोळी, प्रथमेश लोमटे, आत्माराम पवार, अमर शेंडगे, बब्रुवान वाकुरे, बाळू सरवदे, विलास वीर, आदी शेतकरी, शेतमजूर व दूध उत्पादक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आदी  सहभागी झाले होते.