काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविरुद्ध भाजप आक्रमक 

उस्मानाबादेत नाना पटोलेंच्या प्रतिमेची गाढवरून धिंड 
 

उस्मानाबाद  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविरुद्ध भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. उस्मानाबादेत आज भाजपच्या कार्य्ककर्त्यानी नाना पटोलेंच्या प्रतिमेची  गाढवावरून धिंड काढून निषेध केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नांव पुर्ण जगभरात पोहचवले असुन आज भारत देशाकडे वाकडया नजरेने बघण्याची कुठलाही देश हिम्मत करत नाही. देशात वेगवेगळया योजना राबवुन जनतेच्या हितासाठी असंख्य विकास कामे केलेली आहेत आणि करत आहेत. स्वातंत्र मिळाल्यापासुन काँग्रेसला जे शक्य झालं नाही ते मोदी सरकारच्या कार्यकाळात होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडे निवडणुकीसाठी कुठलाही ठोस मुद्दा नसल्यामुळे काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य भाषा वापरुन बदनाम करत आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्या कुटील राजकारणामुळे पंजाब मधील मोठया दुर्घटनेतुन सुखरुप वाचले.

 महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपशब्द वापरुन बदनामी केली होती. त्यानंतर देश भरात त्यांच्या ‍विरोधात निदर्शने, आंदोलने करुन त्यांच्या अटकेसाठी विविध ठिकाणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. काल नाशिक येथे नाना पटोले यांनी आणखी एकदा खालच्या स्तरावर जावुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. त्याचा निषेध म्हणुन आज सबंध महाराष्ट्रासह उस्मानाबाद  जिल्हयात ही नाना पटोले यांच्या प्रतिमेची गाढवावरुन धिंड काढुन निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी  भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,  राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, राहुल काकडे, ललिता जाधव, अर्चना अंबुरे, पूजा राठोड, प्रवीण सिरसाठे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, विनायक कुलकर्णी, पांडुरंग लाटे, अभिराम पाटील, ॲड. कुलदीपसिंह भोसले, राहुल शिंदे, ओम नाईकवाडी, नरेंद्र वाघमारे, संदीप इंगळे, प्रीतम मुंडे, पपिन भोसले, सुजित साळुंके, सूरज शेरकर, विनोद निंबाळकर, सुनील पांगुडवले, प्रसाद मुंडे, हिम्मत भोसले, गणेश एडके, सलमान शेख, सागर दंडणाईक, गिरीष पानसरे, स्वप्नील नाईकवाडी, अमोलराजे निंबाळकर, शाम तेरकर, अतुल चव्हाण, जगदीश जोशी, मेसा जानराव, रोहित देशमुख,  गणेश इंगळगी, पंकज जाधव, यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे तसेच महिला मोर्चाचे असंख्य पदाधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते.