ठाकरे सरकार पडल्यानंतर सध्याच्या महायुती सरकारने ५० टक्के निधी दिला
धाराशिव - धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग वेळेत पूर्ण करण्याकरिता महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला होता .संबंधित रेल्वेमार्गची फाईल ठाकरे सरकारमध्ये तयार होती दुदैवाने ठाकरे सरकार पडल्यानंतर सध्याच्या महायुती सरकारने या रेल्वेमार्गाकरिता राज्याच्या हिस्साचे 50 टक्के निधी कॅबिनेट मध्ये मंजूर केला, अशी कबुली शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिली.
खा. ओमराजे म्हणाले की , महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तिर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावरती आणण्याबाबत अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु होते. 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापूर येथून करतानापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गाची निर्मिती बाबत घोषणा केली. धाराशिव या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करुन सुरवातीस अर्थसंकल्पा मध्ये या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाकरिता निधी मंजूर करुन घेण्यात यश आले.
यानंतर रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न करुन या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत सोलापूर विभागाकरिता मुख्य अभियंता यांची नियुक्ती करण्याबाबत पत्रव्यवहार करुन उपमुख्य अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्य अभियंता यांची नियुक्ती झाल्यानंतर सदर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाच्या कामास गती देण्याकरिता डिमार्कटेशन टेन्डर संदर्भात पाठपुरावा करुन प्रलंबित असलेले डिमार्कटेशन टेंडर काढण्यात आले. यानंतर सदर रेल्वे प्रकल्पास योग्य ती गती येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर पुणे येथे मध्य रेल्वेचे असलेले कार्यालय भुसावळ येथे स्थलांतर झाले असल्याने ते रद्द करुन सदर कार्यालय पुणे येथे ठेऊन धाराशिव –तुळजापूर या रेल्वे मार्गाकरिता एका नोडल ऑफिसरची नियुक्तीबाबत पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण वेळेत पूर्णाहोण्यास मदत झाली.
रेल्वे करिता धाराशिव व सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली तदनंतर ही जमीन संपादित करत असताना धाराशिव शहरानजीक संजा शिवारामध्ये राममंदिर देवस्थान, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर देवस्थान जमीन तसेच सोलापूर जिल्हयाच्या हद्दीतील वनविभागाकडे असलेली जमीन संपादन करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याहोत्या याअनुषंगाने जिल्हाधिकारी धाराशिव व .जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी सातत्याने आढावा बैठकीचे आयोजन करुन सदर तांत्रिक आडचणी दूरकरण्यात यश आले यामुळे दोन्ही जिल्हयातील साधरणता 660 हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव राजस्व प्राधिकारी यांच्या मार्फत सादरकरुन 22 गावातील जमीन संपादित करण्याकरिताचे जेएमआर फीस पोटी 60 लक्ष रुपयाचा निधी जमा करण्यात आला एकूण 84.44 किलोमीटर लांबी असलेल्या रेल्वे प्रकल्पाकरिता 904.92 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
हा रेल्वे मार्ग वेळेतपूर्ण करण्याकरिता महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला होता .संबंधित रेल्वेमार्गची फाईल ठाकरे सरकारमध्ये तयार होती, दुदैवाने ठाकरे सरकार पडल्यानंतर सध्याच्या महायुती सरकारने धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग करिता राज्याच्या हिस्साचे 50 टक्के निधी कॅबिनेट मध्ये मंजूरी दिली.
सुरवातीच्या काळात धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाकरिता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी अत्यल्प असल्यामुळे भरीव अर्थिक निधीची गरज असल्याने 5 कोटी रुपय निधी मंजूर करण्याबात प्रयत्न करण्यात आले. नंतरच्या काळामध्ये रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना रेल्वे मार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळून देण्याकरिता जिल्हाधिकारी व संबंधित शेतकऱ्यांशी मावेजा संदर्भामध्ये बैठक घेऊन शेतकऱ्यानकडून जमीनीची खरेदी रेडी रेकनरच्या दरानुसार न करता शेतकऱ्यांची संपादित केलेलीजमीन थेट खरेदी करुन शेतकऱ्यांना मावेजा देण्याबाबत प्रस्ताव दाखल करणेबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांना सूचीत करण्यात आले.
लोकसभेच्या विविध आधिवेशनामध्ये धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेच्या अनुषंगाने सातत्याने तारांकित प्रश्न शुन्यप्रहार, तसेच 377 अंतर्गत या प्रश्नाबाबत पाठपुरावा करुन सुरुवातीचे रेल्वेमंत्री पियुषजी गोयल व सध्याचे रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णवजी तसेच रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवेजी यांच्या वैयक्तीक भेटी घेऊन धाराशिव- तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या अनुषंगानेपाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यास यश येऊन धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील रेल्वेमार्गाचे काम सुरु करण्याबाबतचे टेंन्डर मध्य रेल्वे विभाग सोलापूर यांनी काढले आहे. संबंधित रेल्वेमार्ग वेळेत पूर्ण करणेबाबत प्रयत्न करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना संपादित जमीनीचा मावेजा थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे मिळवून देणेबाबत प्रयत्न करणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.