काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राजाभाऊ शेरखाने 

 

उस्मानाबाद - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने उस्मानाबाद येथील राजाभाऊ शेरखाने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदावर त्यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस पार्टीच्या सर्वेसर्वा खा.सोनियाजी गांधी, खा.राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष हत्तीअंबिरे यांच्या आदेशानुसार  व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील, ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील,माजी जिल्हाध्यक्ष विश्वास अप्पा शिंदे यांच्या शिफारशीनुसार व मार्गदर्शनाखाली  ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे. पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून महाराष्ट्रात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे निवडीनंतर नूतन प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ शेरखाने यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमधील अनेक चढ-उतार पाहिलेले राजाभाऊ शेरखाने हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीत मुख्य संघटक पदावर असताना त्यांनी अतिशय कुशलतेने पक्षबांधणी करुन संघटन मजबूत करण्यावर त्यांनी कायम भर दिलेला आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर सत्तास्थाने बळकट करुन त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी याकरिता ते सतत प्रयत्नशील असतात.

 आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार  काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल त्यांचा कार्यकत्याृंच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक अहमद चाऊस, अल्पसंख्यांक विभागचे जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष जाकीर शेख व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.