शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन

यापुढे असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही - राष्ट्रवादीच्या नेत्यांचा इशारा
 

उस्मानाबाद -  खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिव्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उस्मानाबाद येथे आज (दि.9) मूक आंदोलन करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आंदोलकांनी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणार्‍या अशा घटना यापुढे खपवून घेणार नाही, असा सणसणीत इशारा देखील यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला.


यावेळी बोलताना एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे म्हणाले, सगळ्यांचा विचार करणार्‍या नेत्याच्या घरावर झालेला हल्ला अतिशय निंदणीय आहे. महामंडळाचे आपण अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना कामगारांच्या  हिताचे निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून एसटी कामगारांचा संसार सुखाचा होईल असे काम करण्याचे आदेश त्यांनीच दिले होेते. एसटी कामगारांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. सध्या चांगले काम करणार्‍या व्यक्तीला निरुत्साही करण्याचा निंद्य प्रकार राज्यात सुरू आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत आहे. यापुढे असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या, काल शरद पवार यांच्याबाबत झालेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिला. एसटी कामगारांच्या नावाखाली भाजपा पुरस्कृत अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येत नाही म्हणून राज्यातील सलोखा बिघडविण्याचे काम अ‍ॅड.सदावर्ते यांच्या माध्यमातून केला जात आहे. झालेला प्रकार सहज घडलेला नसून पूर्वनियोजित आहे. भाजपाने इडी स्वतःच्या दावणीला बांधली तसे आम्ही राज्याचे गृह खात्याच्या बाबतीत केलेले नाही. भाजपाचे हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू असेही त्यांनी सांगितले.


या आंदोलनात संजय पाटील दुधगावकर, डॉ.प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर, मसूद शेख, श्याम घोगरे, आदित्य गोरे, नितीन बागल, अमित शिंदे, विशाल शिंगाडे, अ‍ॅड. योगेश सोन्ने पाटील, महादेव माळी, कुणाल निंबाळकर, जयंत देशमुख, आयाज शेख, गणेश खोचरे, रणवीर इंगळे, रॉबिन बगाडे, अन्वर शेख, इस्माईल शेख, मन्नान काझी, अजयकुमार कोळी, नवनाथ राऊत, मृत्यूंजय बनसोडे, सौ.सुरेखा जाधव, सौ.अप्सरा पठाण, बालाश्री पवार, सौ.प्रीती गायकवाड, अमृता दुधाळ, श्वेता दुरुगकर, महेश नलावडे, अमित शिंदे, ईस्माईल शेख, अमोल कसबे, अमोल भातभागे, अजित चंदने, प्रशांत देशमुख, दशरथ माने, प्रकाश बालकुंदे, आतिश मरगणे, भागवत कोळगे, असद पठाण, प्रकाश गवाड, दत्ता पवार, बाळासाहेब खांडेकर, महावीर हुबाले, प्रवीण लाडूळकर, तेजस भालेराव, विलास पडवळ, विक्रम पडवळ, डॉ.सुरज मोटे, प्रेमचंद मुंडे, डॉ.अविनाश तांबारे, लतीफ पटेल, अमोल सुरवसे, मनोज मुदगल, बाबा शेंडगे, अ‍ॅड. मनीषा पाटील, सौ.किरण निंबाळकर, शीला आडसूळ, सौ.अंजली जाधव, सौ.संगीता काळे, सौ.प्रभावती दिवटे, अमजद काझी, विराट पाटील, सईद काझी, नितीन चव्हाण, लक्ष्मण राऊत, औदुंबर पाटील, रणजित वरपे, नंदकुमार भुतेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, युवक, महिला, युवती राष्ट्रवादीसह विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेसनेही नोंदवला आंदोलनात सहभाग
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूक आंदोलनात काँग्रेस पदाधिकार्‍यांनीही सहभाग नोंदवून शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, संग्राम बनसोडे आदीनी सहभाग नोंदवला.