झेडपीच्या सर्वसाधारण सभेत खुन्नस ... 

अर्चनाताई विरुद्ध सक्षणा यांच्यात सामना 
 


उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आज आमने- सामने आले होते. हमारी तुमरी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला, सक्षणा सलगर यांनी अर्चनाताईच्या पीएला बाहेर हाकलले तरअध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सक्षणा सलगर यांच्या अंगरक्षकांना बाहेर हाकलले. खुन्नस / आरोप - प्रत्यारोप यांनी सभा वादळी ठरली..

आज  ( गुरुवार )  रोजी  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभापार पडली.  यावेळी सक्षणा सलगर यांनी माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई  पाटील यांचे स्वीय सहाय्यक इर्शाद काझी यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यासाठी हट्टाहास केला , त्यामुळे काझी यांना बाहेर जावे लागले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी  सक्षणा सलगर  यांचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलिसांना बाहेर काढले... झेडपीच्या सर्वसाधारण सभेत अशी खुन्नस पहिल्यांदा पहावयास मिळाली. 

पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मज्जाव 


जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांत अभूतपूर्व गोंधळ पहावयास मिळाला , एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. यावेळी उपस्थित पत्रकार चित्रीकरण करीत असताना त्यांना मज्जाव  करण्यात आला. मज्जाव  करणाऱ्या माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांचा पत्रकारानी निषेध केला


अर्चनाताई विरुद्ध सक्षणा यांच्यात सामना रंगणार 

अर्चनाताई विरुद्ध सक्षणा यांच्यातील सामना आता जिल्हा  परिषदेच्या तेर गटात रंगणार आहे. या गटात हायहोल्टेज लढत होईल, अशीच चिन्हे आहेत.. अर्चनाताई पाटील या भाजप आमदार राणा  पाटील यांच्या पत्नी आहेत तर सक्षणा सलगर या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा वरदहस्त आहे. 

विशेष म्हणजे सक्षणा सलगर यांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच  राजकारणात  ब्रेक दिला होता. सलगर यांना पाडोळी मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते, पण राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेल्याने सक्षणा सलगर यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. 

विशेष म्हणजे अर्चनाताई पाटील आणि सक्षणा सलगर यांच्यात मागे एकदा एका पक्षात असताना सामना झाला होता, त्याची गुंज अजूनही कानात घुमत आहे. 

सक्षणा सलगर यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपथितीमध्ये पाडोळीमध्ये एक कार्यक्रम घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते, जिल्हा परिषद निवडणुकीची ही रंगीत  तालीम ठरली आहे.