पंचवीस  लाख युवा वारीयर्सची टीम उभी करणार 

- भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर
 

तुळजापूर - युवा मोर्चाचे नूतन  प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले व विधिवत पुजा केली त्यानंतर  युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करत तरुण पिढीला भाजपच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले. 

 येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थां व नगर पालिका निवडणुकांमध्ये युवकांना मोठया प्रमाणात संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असुन युवकांनीही आपली सर्व ताकद राष्ट्र कार्यासाठी समर्पीत करण्याची गरज असल्याचे राहुल लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी बैठकीमध्ये नुतन प्रदेशाध्यक्ष लोणीकर यांना आश्वाशित केले की,  येणाऱ्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव जिल्हयामध्ये आणखीण ताकदीने काम करेल व भारतीय जनता पार्टीचे कार्य तळागळा पर्यंत पहोचविण्याचे कार्य करणार असल्याचे सांगीतले. तसेच युवा वॉरियर्सच्या माध्यमातून आ.राणाजगजितसिंह पाटील, माजी आ.सुजितसिंह ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात १८ ते २५ वयोगट असणाऱ्या युवकांची मोठी फळी तयार करुन शाखा उघडण्याचे सांगीतले. त्याच प्रमाणे युवती आघाडी यांची देखील मजबूत फळी निर्माण करण्याचे उद्दीष्ट यावेळी जाहीर केले. तसेच कार्यकर्त्यांना युवा मोर्चा हा भाजपा मध्ये मुख्य पदावर कार्य करण्याची संधी मिळवून देणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले.

यावेळी धाराशिव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भरजरी फेटा शाल श्रीफळ पुष्पहार व तुळजाभवानीचा फोटो देऊन सत्कार केला. या बैठकीचे युवा मोर्चा तुळजापुर तालुका अध्यक्ष आनंद कंदले यांनी प्रस्ताविक करताना आश्वासित केले तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात युवा संघटन व युवा वॉरियर्सची शाखा विस्तार मोठया प्रमाणात केले जाईल असे सांगतले. यावेळी आभार सरचिटणीस कुलदिप भोसले यांनी मांडले. 

या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, शिवाजीराव बोधले, आरपीआई प्रदेश उपाध्यक्ष (रोजगार आघाडी) संजय नाना शितोळे, प्र.का.स. मकरंद पाटील, प्रदेश सचिव बनसोडे, पांडूरंग अण्णा पवार,  प्रवीन घुले, सचिन लोंढे, दिनेश बागल, अभिराम पाटील, गणेश देशमुख, सलमान शेख, रोहीत पाटील, राजेश्वर कदम, राम चोपदार, सचिन रसाळ, सागर पारडे, प्रसाद पानपुडे, विकास मलबा, ओम नाईकवाडी, जगदीश जोशी, प्रितम मुंडे, रोहीत देशमुख, प्रसाद मुंडे, किशोर तिवारी, निलेश दिवाने, अभिजीत लोके, दादुस गुंड, धनराज नवले, अमोल पेठे, शंकर मोरे, निलेश नाईकवाडी, नवनाथ सोलंकर, ज्ञानेश्वर पडवळ, रोहीत देवकर, राम छत्रे पुजारी, खंडु छत्रे पुजारी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.