‘साहेब चषक’ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांच्यासह मान्यवरांची स्टेडियमवर फटकेबाजी !
 

उस्मानाबाद -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘साहेब चषक’ क्रिकेट स्पर्धेचे बुधवार, 23 मार्च रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिराजदार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मैदानावर जोरदार फटकेबाजी करुन क्रिकेट संघांचा उत्साह वाढविला. उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर दि. 23 ते 27 मार्च 2022 या कालावधीत या स्पर्धा होत असून विजेत्या संघासह खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली असल्याची महिती संयोजकांनी दिली.

सकाळी श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांच्या हस्ते पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असद पठाण,  शहराध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील, राजकुमार पवार, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे,  तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, विधिज्ञ विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. योगेश सोन्ने-पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव निखिल कोळी, जिल्हा सरचिटणीस अजय कोळी, माजी नगरसेवक बाबा मुजावर, बाबा इस्माईल, युवक नेते रणवीर इंगळे, मृत्यूंजय बनसोडे,  शेखर घोडके, ए.बी. 17 क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अक्षय बावस्कर, सचिव वैभव घोडके, गणेश मगर, किरण चव्हाण, यांच्यासह क्रिकेट संघातील खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

जय बजरंग विरुद्ध डेली क्रिकेट क्लबमध्ये पहिला सामना
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जय बजरंग क्रिकेट क्लब विरुद्ध डेली क्रिकेट क्लब यांच्यात पहिला सामना खेळविण्यात आला. डेली क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.


खेेळाडूंसह क्रीडाप्रेमींना मोठी संधी
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. कोरोना काळामुळे हे शक्य झाले नाही. आता वर्षभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद येथे साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
- सुरेश बिराजदार
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद.

दररोज पाच सामने
स्पर्धेसाठी उस्मानाबाद शहरातील 16 संघांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. दररोज पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. यातून अंतिम फेरी गाठणार्‍या संघांमध्ये सामने खेळविले जातील. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल.
- अक्षय बावस्कर
अध्यक्ष, ए.बी. 17 क्रिकेट क्लब

अशी आहेत पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे   नेते संजय निंबाळकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने 31 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये व चषक माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वतीने तर चौथे पारितोषिक 11 हजार रुपये व चषक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मृत्यूंजय माणिक बनसोडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंना वैयक्तिक बक्षीसे देखील ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये मॅन ऑफ द सिरीज 5 हजार रुपयाचे बक्षीस माजी नगरसेवक बाबा मुजावर यांच्या वतीने, मॅन ऑफ मॅच फायनल 2 हजार रुपये अनिकेत पाटील यांच्या वतीने, बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज 2 हजार रुपये माजी नगरसेवक बाबा इस्माईल यांच्या वतीने तर बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज 2 हजार रुपये जयंत देशमुख यांच्या वतीने अशी बक्षीसे ठेवणयात आलेली आहेत. स्पर्धकांना जर्सी टी-शर्ट माजी नगरसेवक प्रदीप घोणे यांनी तर विजेत्यांसाठी चषक शरदचंद्र पवार फाऊंडेशनचे शेखर घोडके, रणवीर इंगळे यांनी उपलब्ध करुन दिल्याची माहिती संयोजकांनी दिली.