विकासाला विरोध करण्याची आ. राणा पाटील यांची कपटनिती जनतेसमोर उघड  

शिवसेनेचे पालिका गटनेते सोमनाथ गुरव यांचा थेट आरोप
 

उस्मानाबाद - गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासुन शहराची पालिका ज्यांच्या हातात होती, त्या पाटील बापलेकांना शहराची बकाल अवस्था केली हे जगजाहीर आहे.आता नव्या दमाच्या खासदार,आमदारानी विकासकामाना मंजुरी मिळवुन विकासाचा ध्यास घेतला आहे.तिथे देखील खोडा घालुन व घाणेरडे राजकारण करुन राणा पाटील यांनी विकासकामाना विरोध केला.मतदारसंघ नसतानाही राणा पाटील यांनी केलेल्या या कृतीचा सामान्य नागरीक देखील निषेध व्यक्त करत आहेत.आमदार व खासदार जोडीच्या विकासकामाची गती पाहुन जनता त्यांच्या मागे जाणार हे दिसु लागल्यामुळेच राणा पाटील यांना पोटशुळ सुटल्याचे शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते सोमनाथ गूरव यानी म्हटले आहे.  

गुरव यानी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हटले आहे की, गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासुन आपल्या बगलबच्च्यांच्या सोयीसाठी नगरपालिकेच्या सत्तेचा उपयोग  करुन शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला.उजनी योजनेतही तुमचे हात ओले होऊन योजनेसाठी दुप्पट खर्च करावा लागला होता याचा विसर जनतेला कधीच पडणार नाही. तुमच्या दोन पिढ्याना जे जमल नाही ते नव्या आमदार व दमदार खासदारांनी शहरासाठी करुन दाखविले. पण ही गोष्ट तुमच्यासारख्या खुज्या व्यक्तीला कशी सहन होईल.? शहरासाठी आलेल्या 40 ते 45 कोटीच्या निधीतुन विकासकामे झाल्यावर शहराचे चित्र बदलणार. लोकांना दोन्ही नेतृत्वातील फरक लक्षात येणार ही भिती तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. मग त्याला कपट व कारस्थान करुन तुम्ही विकासकामाना विरोध करणे हे तुमच्यासारख्या संकुचित नेत्याकडुन अपेक्षितच होते असा टोला  गुरव यानी आमदार राणा पाटील यांना लगावला.

 विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करुन तुमच्यातील कपटीपणा जगजाहिर केला.एका बाजुला तारांकित प्रश्न करुन कामाना विरोध करायचा तर दुसऱ्या बाजुला जिल्हा प्रशासनाकडे त्याच कामाची मागणी करायची.घाणेरड्या राजकारणाने जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसविण्याचा तुमचा हा शहाजोगपणा आता जनतेच्या समोर उघडा झाला आहे. हे लक्षात आल्यानंतर नौटंकी सूरु केली त्यालाही तेथील नागरीकांनी थेट विरोध करुन समोरासमोर निरुत्तर केले. तोंड लपवुन पळण्याची वेळ राणा पाटील आपल्यावर आल्याची आठवण राहु द्या असा घणाघात  गुरव यानी केला.

सत्तेसाठी दारं झिजवुन गेलेल्या पक्षाची सत्ता आली नाही त्याचे शल्य कमी होत की काय पण राज्याच्या सत्तेवर शिवसेनेचा वाघ बसल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथुन पुढे सूरु झालेल्या प्रत्येक विकासकामाला विरोध करण्याची वृत्ती सूरु ठेवली पण आमदार व खासदार हे देखील तुम्हाला पुरुन उरल्याचे दिसुन आले आहे.शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये कामे व्हायला पाहिजे हा प्रामाणिक हेतु ठेवुन 40 ते 45 कोटीचा निधी नगरविकास खात्याच्या मार्फत या दोन्ही नेत्यांनी खेचुन आणला. एवढेच नव्हे तर शहरासाठी जवळपास पावणे दोनशे कोटीची भुयारी गटार योजना मंजुर केली.हे पाहुन तुमच्या पोटात गोळा आला नसता तर नवलच एवढी कामे झाल्यावर तुमच्यासारख्या बोलघेवड्या राजकारण्याकडे लोक कशाला येतील याचा आपल्याला अंदाज आला.त्यातुनच तुम्ही हे कृत्य केले. आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर हे दोन्ही सकारात्मक व विकासात्मक राजकारण करणारे नेते आहेत.लोक तुमच्या घाणेरड्या राजकारणाला आता कंटाळुन गेली आहेत.नकारात्मक राजकारणाने शहरासह जिल्ह्याचा भकास झाला आता ही घाण काढताना तरी पुन्हा घाण करु नका असा टोला सोमनाथ गुरव यांनी राणा पाटील यांना लगावला आहे.