उस्मानाबाद जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, पोलीस सुस्त !
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात किमान २५ चोऱ्यांची नोंद झाली आहे. 'जागते रहो' म्हणत अनेक गावात लोक स्वतःच पहारा देऊ लागले आहेत.
उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस यंत्रणा सुस्त झाल्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे नागरिक चिंतागस्त आहेत. रात्रीची गस्त घालणारे पोलीस नेमके काय करतात ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना
वाशी: बाळु रामलिंग जाधव, रा. यश्वंडी, ता. वाशी हे दि. 10.11.2020 रोजी कुटूंबीयांसह बाहेर गावी गेले होते. दि. 20.11.2020 रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा मजकुराच्या बाळु जाधव यांनी काल दि. 20.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद - सच्चिदानंद पांडूरंग उंबरे, रा. आदर्श नगर, उस्मानाबाद हे दि. 12.11.2020 रोजी कुटूंबीयांसह वाणेवाडी येथे गेले होते. ते 19.11.2020 रोजी घरी परतले असता राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने नकली चावीच्या सहायाने उघडून घरातील 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, 500 ग्रॅम चांदीचे दागिने- वस्तू, कॅसीओ कंपनीचे घड्याळ व 7,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 1,14,500 ₹ चा माल चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा मजकुराच्या सच्चिदानंद उंबरे यांनी काल दि. 20.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (ग्रा.): सुदर्शन पाटील, रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद यांच्या शेतातील पत्रा शेडचा दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. 20.11.2020 रोजी रात्री 03.00 वा. सु. ढकलून उघडून आतील सुटकेसमध्ये ठेवलेली 70,000 ₹ रोख रक्कम व आयटेल कंपनीचा एक भ्रमणध्वनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुदर्शन पाटील यांनी आज दि. 21.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.