लोहाऱ्यात पत्याच्या क्लबवर रेड 

शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी सापडले 
 
तीन शिक्षक, एक नगरसेवक, एक न. प. माजी बांधकाम सभापती जुगार खेळताना सापडले आहेत. ही  बातमी वृत्तपत्रात येऊ नये म्हणून क्लब चालकाने काही स्थानिक पत्रपंडितांना पाकिटे दिल्याची चर्चा रंगली आहे. 

उस्मानाबाद - लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर असलेल्या एका पत्याच्या क्लबवर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी टाकलेल्या रेडमध्ये  काही शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी जुगार खेळताना पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर  एक जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी रमी आणि तिरट  नावाचा जुगार खेळला जात होता. जुगार खेळण्यासाठी सोलापूर,उमरगा येथून काही राजकीय पुढारी येत होते. 

त्याची माहिती मिळताच उस्मानाबादच्या  प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी रेड मारली असून, त्यात काही शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी जुगार खेळताना पकडण्यात आले आहेत. 

स्थानिक पोलीस निरीक्षकांना या जुगार अड्ड्याची माहिती होती, तरीही त्याकडे चिरीमिरी घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. उस्मानाबादेत आलेल्या  एका प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी या पत्याचा क्लबवर रेड मारून हा  क्लब उध्वस्त केला. 

१४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल, काही जण पळून गेले 

जुगार अड्डा चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन पोलिसांनी लोहारा (बु.) शिवारातील शासकीय वस्तीग्रहा लगतच्या दुध केंद्राच्या पत्रा शेडवर दि. 19.11.2020 रोजी 16.50 वा. सु. छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालक 1)विजय फावडे याने उपलब्ध्द करुन दिलेल्या जुगार साहित्याने 2)दत्तात्रय हुलसुरे 3)संजय कदम 4)मधुकर भरारे 5)काशीनाथ पांचाळ 6)अमर कांबळे 7)दत्ता वाघमारे 8)अबुल कादरी 9)किशोर पाटील 10)गोपाळ चव्हाण 11) अतुल क्षीरसागर 12)सुरेश साळुंके 13)विजय भरगंडे 14)विश्वनाथ जट्टे सर्व रा. लोहारा हे तीरट जुगार खेळतांना 76,900 ₹ रोख रक्कमेसह जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. यावरुन लोहारा पो.ठा. चे पोनि- चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 4, 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.