कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रशासनाला सहकार्य करावे

 
  - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे


उस्मानाबाद :- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी    प्रत्येक व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबाने स्वतःला नियमांमध्ये बांधून घेणे आवश्यक आहे. आपण सगळे जण जाणतो याचा संसर्ग थांबवायचा असेल तर सुरक्षित अंतर पाळणे हे आपल्या सगळ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. रोजच्या जीवनामध्ये खरोखरच आवश्यक असेल तरच बाहेर पडा .गर्दीमध्ये जाणे आवर्जून टाळा. घरांमध्ये वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, आजारी माणसे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणे, नियम पाळणे, योग्य ती खरी माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

           बाहेर जाताना शक्यतो दुचाकी वाहनांवर एकट्यानेच प्रवास करावा. तसेच चारचाकी वाहनांमध्ये दोन व्यक्तीनेच प्रवास करताना आवर्जून गॉगल, मास्क, प्लास्टीक, शील्ड, हँडग्लोज, लिक्वीड सोप, सॅनिटाझर याचा वापर जाणीवपूर्वक करावा. चेहऱ्यावरील मास्कच्या पुढील बाजूस स्पर्श करणे टाळा. मास्क योग्य पद्धतीने बांधा. तो गळ्याभोवती लटकन ठेवू नका. एकदा वापरलेला मास्क,हँडग्लोज त्वरित स्वच्छ धुवून वापरा. आपल्या सोबत असलेल्या वस्तू उदाहरणात बॅग, डायरी, नोंदणी पुस्तिका इतर वस्तू सॉनिटाझर स्वच्छ पुसून घ्या. कामानिमित्त आपले हात टेबलाच्या पृष्ठभागावर दरवाज्याच्या कडीला, गाडीचा हॅंण्डल,    डोअर बेल, जिना चढण्यासाठी लावलेले रेलींग इ. ठिकाणे सतत लागत असतात. त्यामुळे आपले हात साबणाने सतत स्वच्छ धुवा. सतत आपल्या चेहऱ्याला व डोळ्याला हाताचा स्पर्श करणे टाळा, असे जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी सूचित केले.

          तरुणांनो स्वतःला गुटखा, तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर ठेवावे. राहते घर, कार्यालय, कारखाने, बैठकीची खोली, सभागृहे, मोकळ्या जागा,व्हरांडा,प्रवेशद्वारे इ. सर्व ठिकाणी दिवसातून किमान 3 वेळेस निर्जंतुक करावी. गर्दी होणारे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिबंधीत केले आहे. प्रशासनाकडून थर्मल गनचा वापर करून व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी सहकार्य करावे. प्रशासनाच्या वतीने  आवश्यकतेनुसार वेळोवेळी करण्यात आलेले जनता कर्फ्यु किंवा इतर आवश्यक घटकांचा साठी बंदी लागू करण्यात येते.यातही आपल्या सहभाग असणे आवश्यक आहे,असे श्रीमती मुधोळ    मुंडे यांनी स्पष्ट केले.

           जनतेच्या काही तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसील कार्यालया अंतर्गत नियंत्रण कक्ष 24x7 चालू आहेत. तसेच याठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच खोकला, सर्दी, ताप, श्वास घेण्यासाठी  त्रास जाणवत असेल तर तात्काळ शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधा. हा संसर्ग कधीही कोठेही कोणालाही होऊ शकतो. अशावेळी योग्य माहिती देणे, माहिती घेणे, वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे, व लोकांना भेटले भेटतांना स्पर्श करणे टाळा. शक्यतो आपल्या बरोबर अतिरिक्त मास्क/स्वच्छ रुमाल बाळगा.
जे नागरिक रेड झोन मधून किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांनी स्वतः शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यासाठी जर संस्थात्मक विलगीकरण (INSTTUATIONAL QUARNTINE) किंवा गृह विलगीकरण (HOME QUARNTINE) याबाबत जर डॉक्टरांनी सूचना दिल्या असतील, तर त्या कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच त्यांची माहिती प्रशासनाला देणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी म्हटलं. उपरोक्त सर्व नियम व सूचनांचे पालन उस्मानाबादचे नागरिक निश्चितच करतील असा  विश्वास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केला.