बदली प्रकरणात उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे नाव !

इंडिया टीव्हीने खुलासा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
 

उस्मानाबाद - पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत केला होता, त्यानंतर त्यांनी दिल्लीत  केंद्रीय गृह विभागाच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालाच्या पुष्ठ्यर्थ असलेला 6.3 जीबी डेटा सुपूर्द केला. 

त्यानंतर इंडिया टीव्हीने कोणत्या अधिकाऱ्यांनी क्रीम पोस्टिंग घेतली याचा खुलासा केला असून, त्यात उस्मानाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे नाव नऊ नंबरला दिले आहे. इंडिया टीव्ही च्या या बातमीचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पालवे यांचे नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्याशी संपर्क साधला असता,  पालवे म्हणाले  की ,  महादेव इंगळे  हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील असून, तो मंत्रालयात फिरतो. त्याने कोणत्या कारणासाठी आपणशी संपर्क केला हे आपणास आठवत नाही. आपली बदली जुलै २०१९ मध्ये उस्मानाबादला झाली आहे. म्हणजे हे सरकार येण्याअगोदर झाली आहे. तेव्हापासून आपण येथेच आहे. 

तुम्ही टीव्ही मधील बातमी पाहा , पोस्टिंग कुठे आहे आणि कुठे मागितली हे नमूद आहे.  माझ्या नावापुढे पोस्टिंग कुठे मागितली आहे, हे नमूद नाही. महादेव इंगळे  व्यक्तीशी आपण कधीही भेटलो नाही आणि त्याला आपण ओळखत नाही, असेही  पालवे म्हणाले. 

त्या 6.3 जीबी डेटात दडलयं काय ?

वाचा सविस्तर 

पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीच्या मोठ्या रॅकेटचा हा घ्या पुरावा !