एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला...

 
स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांची मागणी 



उमरगा  - यावर्षी 13 सप्टेंबर  2020 ला होणार्‍या राज्यसेवा पुर्व परीक्षा घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली आहे. एकीकडे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेउ नये म्हणून न्यायालयात गेले आहे, परंतु एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा घेणार असा दुजाभाव का ? असा प्रश्न स्टुडंट हेल्पींग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा  ज्ञानराज  चौगुले यांनी उपस्थित केला.

लाँकडाउन 31 ऑगस्ट पर्यत सरकारने वाढवले आहे. त्यात  बसगाडया ही बंद आहेत. विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जाणे परवडणारे नाही.या विद्यार्थ्यांना केंद्र बदलण्याची परवानगी ही दिली नाही.राज्यातील लाखो विद्यार्थी हे  ह्या परीक्षेला बसतात.त्यात 50% हुन जास्ती विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात व केंद्र ही पुणेच निवडतात.एकदम विद्यार्थी शहरात आले तर संक्रमणाचा धोका निश्चित आहे.तर कश्या प्रकारे नियोजन करणार? कुठे ही बाधा होऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घेत असताना हे विद्यार्थी परीक्षेला आले आणि कोरोना विषाणूच्या संपर्कात आले तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे.त्यामुळे कोरोनाची तीव्रता कमी होत नाही तो पर्यंत एमपीएससी मार्फत होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी आकांक्षा  ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.