माझे कुटुंब, माझी जबाबदारी : उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिला

माझे कुटूंब, माझी जबाबदारी सर्व्हेक्षणांतर्गत दुर्धर आजारी २८ हजार ५३३ व्यक्तींचे लसीकरण
 

उस्मानाबाद  - माझे कुटूंब, माझी जबाबदारी तिसरा टप्पा राबविण्यात जिल्हा राज्यात पहिला आला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये पहिल्या लाटेत ६ हजार ‌४८८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. तर ४५ वयाच्या पुढील दुर्धर आजार असणाऱ्या २८ हजार ५३३ व्यक्तींचे दि.२५ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आले असून ५० टक्के सहव्याधी असलेल्या व्यक्तींची लसीकरण करण्यात आले आहे. माझे कुटूंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षण मोहिमेत राज्यात उस्मानाबाद जिल्हा पहिला आला आहे. तर उर्वरित सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणूंच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यामध्ये १७ हजार ८५१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. तर या कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण एप्रिलमध्ये करण्यात आले. यामध्ये कोरोना, आयएलआय व सारी रुग्ण यांच्या बरोबरच ५६ हजार ९५१ व्यक्ती उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह, हृदयविकार व इतर सहव्याधी असणारे रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्याच्या विविध ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर किती लसीकरण होणार ? याची माहिती नागरिकांना दैनिकाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ही मोहीम राबवित असताना सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेऊन अशा जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करून घ्यावे असा प्रयत्न आहे‌. त्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होईल.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणात ४५ व यापुढील दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींची तालुकानिहाय संख्या, चालू आठवड्यात केलेली लसीकरण,  प्रगत लसीकरण केलेले दुर्धर आजारी व्यक्तींची संख्या व टक्केवारी पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - ११९९७ - १०२४ - ६९५९ व ५८ टक्के, तुळजापूर - ९२७२ - ३२८ - ३६३३ व २९ टक्के, वाशी - ४९७८ - १८२ - २०३१ व ४१ टक्के, लोहाच्या - ४९०७ - ४६८ - २६७९ व ५५ टक्के, उमरगा - ७३२२ - ८१५ - ४४५७ व ६१ टक्के, परंडा - ४६७६ - १४६ - १८११ व ३९ टक्के, भूम - ३७९४ - ५९४ - २२०० व ५८ टक्के व कळंब - १०००६ - ८३२ - ४७६३ व ४८ टक्के असे एकूण ५६९५१ - ४३९० - २८५३३ व ५० टक्के आहे