मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा

 

भोपाळ - मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री  कमलनाथ यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी  पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत आज (20 मार्च) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला.

 कमलनाथ यांनी, भाजपवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, राज्यातील जनतेने पाच वर्षे सरकार चालविण्यासाठी मला बहुमत दिले होते. पण भाजपने राज्यातील जनतेची फसवणूक केली. परंतु जनता त्यांना माफ करणार नाही.