अंतरवाली शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी 

वन परिमंडळ अधिकाऱ्यानी केली पाहणी ( व्हिडीओ )
 

भूम -  भूम तालुक्यातील अंतरवाली शिवारात बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे . हा खरंच बिबट्या होता का ? याचा शोध वन अधिकारी घेत आहेत. 

तालुक्यातील  अंतरवली शिवारात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जेजला गावातील अंगद शिंदे यांना बिबट्या सदृश प्राणी रस्त्याच्या कडेला दिसल्यानंतर त्यांनी वन विभागाला तातडीने सदरील माहिती कळवली. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी सदरील ठिकाणाचे ठाशांचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी निरीक्षण केले परंतु सदरील परिसर माळरान असल्यामुळे आणि कोरडी माती असल्यामुळे ठसे स्पष्टपणे दिसत नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

 यावेळी आसपासच्या परिसरात फिरून तसेच ठशे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला व वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी एकटे फिरू नका हातामध्ये काठी असू द्या किंवा मोबाईल असेल तर मोबाईलची मोठ्या आवाजात गाणी चालू असूद्यात असे आवाहन वनविभागाचे अधिकारी टाके  यांनी केले आहे.  यावेळी वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी  ए जे कुलकर्णी ,वनरक्षक श्री एस यु टाके,  शेळके त्याच बरोबर प्रत्यक्षदर्शी अंगद शिंदे यांच्यासोबत जेजला व अंतरवली ग्रामस्थांची उपस्थिती होती.