शेअर बाजारात आयटी क्षेत्र जोमात
Apr 21, 2020, 16:48 IST
मुंबई - भारतीय शेअरबाजारात या आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.
आयटी क्षेत्र जोमात:
एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की कमकुवत रुपया, सकारात्मक तिमाहीचे परिणाम आणि आयटी सोल्युशन्सची वाढती मागणी यामुळे आयटी उद्योगांनी गुंतवणुकीच्या भावनांना प्रोत्साहन दिले. एचसीएल टेक्नोलॉजी, इन्फोसिस आणि माइंडट्रीसारख्या स्टॉक्सला ३ ते ४ टक्क्यांदरम्यान फायदा झाला. इतर कंपन्या उदा. ३ आय इन्फोटेक, हिंदुजा ग्लोबल, सोनाटा सॉफ्टवेअर आणि अॅप्टेक अनुक्रमे १९.०५%, ९.९९%, ८.६१% आणि ५.७७% पर्यंत वाढले. विप्रो आणि टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स आज सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.
पीएसयू बँकांची चढाई:
शुक्रवारच्या नफ्यात आणखी वाढ करत पीएसयू बँकांनी सोमवारी एका परफेक्ट बुलरनचा आनंद घेतला. यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जेअँडकेसारख्या पीएसबीने एनएसईवर सुमारे २० टक्क्यांची वाढ घेतली. इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अनुक्रमे १६.१८ टक्के आणि १०.०५ टक्क्यांची वाढ घेतली. आज निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये फक्त एसबीआय ०.३९ अंकांची घसरण घेत बंद झाली. निफ्टी बँक इंडेक्समध्ये एक विरोधाभासी चित्र समोर आले. कारण यात ०.७७ टक्क्यांची घसरण झाली. पीएनबी, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँकसारख्या पीएसबीसह फक्त एचडीएफसीच आज ग्रीन झोनमध्ये क्लोज झाली. आरबीएल बँकेने सर्वाधिक ६.५६ टक्क्यांची घसरण केली.
धातूंनी चमक गमावली:
लॉकडाउनचा कालावधीच्या अनिश्चिततेमुळे अनेक मेटलच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. देशव्यापी लॉकडाउननंतरही कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. तसेच सरकारी आकड्यांचे संकेत असे आहेत की, मे च्या पहिल्या आठवड्यात हे आकडे अंतिम टप्प्यात पोहोचतील. त्यामुळे लॉकडाउन वाढू शकते. एसअँडपी बीएसई मेटल इंडेक्समध्ये फक्त नाल्कोने ६.८८ टक्के अधिक सकारात्मक वृद्धी केली. टाटा स्टील, हिंदुस्तान झिंक, वेदांता, कोल इंडिया आणि सेल सहित इतर लिस्टेड शेअर्स पडले. त्यांचे यात हिंडाल्को अग्रभागी असून शेअरबाजारात ती ६.०५ टक्क्यांनी घसरली.