1 जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर FASTag अनिवार्य -जिल्हाधिकारी 

 

उस्मानाबाद - :दिनाक 1 जानेवारी  2021 पासुन भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्ग वरील टोल वर FASTag अनिवार्य करण्यात आलेला आहे. दिनाक 01 जानेवारी 2021 नंतर रोख रक्कम मध्ये कोणतेही पेमेंट स्विकार केले जाणार नाही. प्रत्यक्ष ठिकाणी FASTag काढण्यासाठी केवळ 10 मिनीट लागत असुन खालील ठिकाणी FASTag आपल्या शहरात उपलब्ध आहे, 1. Axix Bank 2. ICICI Bank 3. IDFC Bank 4. SBI Bank 5. HDFC Bank 6. Paytm 7. Kotak Mahindra Bank 8. Syndicate Bank 9. Indusind Bank 10. Union Bank ज्याने आपल्या मुल्यवान वेळेची बचत व इंधनाची बचत करता येईल FASTag चा उद्देश हा प्रवाशांसाठी सुलभ व तात्काळ Exit ही प्रणाली आहे त्याचे ठळक वैशिष्ठे  खालील प्रमाणे नमुद आहेत.

  1.  सुलभ देय
  2. लांब रांगेतुन सुटकारा, काही सेकंदातच RFID द्वारे FASTag ने ऑटोमॅटीक टोल फी घेउन वाहनास विना विलंब पुढे जाता येईल. 
  3.  कॅश च्या स्वरूपातील देया पासुन मुक्ती (सोबत कॅश बाळगण्याची गरज नाही) 
  4.  वेळीची होणारी बचत
  5. डिजीटल इंडिया चे स्वप्न साकार करण्यास मदत  
  6.  My FASTag App (Google Play Store वरून) 
  7.  इंधनाची बचत
  8. सुलभ ऑनलाईन रिचार्ज (Mobile banking Through) 
  9. एसएमएस अलर्ट (Reduce use of paper) तसेच प्रत्येक टोल नाका जसे की 1. पारगांव जि उस्मानाबाद 2. पाडळसिंगी जि.बीड 3.भोकरवाडी-माळेवाडी जि. जालना येथे FASTag तसेच Topup Recharge उपलब्ध असुन सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व शिघ्रतेने आपल्या वाहनांना दिनांक 01 जानेवारी 2021 पुर्वी FASTagबसवून घेणे साठी सहकार्य करावे असे विनंतीवजा आवाहन असुन जनतेने तथा सर्व वाहनधारकांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.

01 जानेवारी 2021 पासुन सर्व टोल वर FASTag अनिवार्य करण्यात आलेले आहेत.