पीक विम्याची जाचक रद्द करण्याची खा. ओमराजे यांची मागणी 

 

उस्मानाबाद - पंतप्रधान पीक विमा योजनेतील वैयक्तिक शेतकऱ्यांनी  विमा पोर्टलवर नुकसान झाल्याची तक्रार नोंदवण्याची जाचक अट रद्द करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे. 

संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा , औसा, निलंगा जि. लातुर व बार्शी जि. सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले.  यावर्षी या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरला. या काळात या जिल्ह्यात  मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्र पाण्यात वाहून गेले. 

या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजेची व्यवस्था कोलमडली त्यामुळे या शेती क्षेत्राची माहिती, वीज नसल्याने, स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे लाखो शेतकरी ऑनलाईन तक्रारी विमा पोर्टलवर नोंदवू शकले नाहीत.  ही अट पंतप्रधान विमा योजनेत शेतकऱ्यांवर जाचक व अन्याय करणारी असुन या अटीमुळे लाखो शेतकरी पीक विमा मिळण्यापासुन वंचित राहिले आहेत. ही अट प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या विमा कंपनीसाठी फायद्याची आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत सादर केलेले अहवाल स्वीकारून झालेल्या नुकसानीची व विम्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.  

पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची तक्रार वैयक्िल्क शेतकऱ्यांनी वीमा पोर्टलवर भरणे ही अट शेतकऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक व जाचक असल्याने ही अट कायमची या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतुन कायमची रद्द करावी व असे आदेश पंतप्रधान पीक वीमा योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व वीमा कंपन्यांना निर्गमीत करावेत व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदन खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहे.