लॉकडाऊनमध्ये कार्डिओ केल्यास वजन नियंत्रणात...
Apr 4, 2020, 16:07 IST
कोरोनाने जगभर हाहाकार माजवलाय. कोरोना व्हायरसचा समुदाय प्रसार ( community transmmition) रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन केले गेलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिवसभर घरीच रहावे लागते तेव्हा आरोग्याची काळजी चांगल्या प्रकारे ठेवू शकत नाहीत किंवा वजन वाढायची वेगळीच काळजी लागून रहाते. ते न होण्यासाठी आपण आपली सकाळ वर्कआउट सत्रासह सुरू करावी.
कार्डिओ केल्याने जेणेकरुन आपण केवळ तंदुरुस्त राहू शकाल याशिवाय दिवसाभरात उर्वरित सर्व कामे करायला तुम्हाला एक नवी उर्जा राहील. आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कार्डिओ करण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत.
- वजन कमी करण्यात कार्डिओ व्यायाम हा खूपच फायदेशीर मानला जातो. म्हणून आपण घरी असताना कार्डिओ केल्यास स्वत: चे वजन नियंत्रणात ठेवू शकते.
- कार्डिओ केल्याने हृदयावर चांगला परिणाम होतो. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कार्डिओ व्यायामामुळे हृदयाचा ठोका वाढतो, रक्तदाब संतुलित रहातो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
- दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कार्डिओ केल्याने शरीरीतील जास्तीची चरबी (fat burning) जाळण्यास मदत होते.
- झोपेच्या वेळी ग्लायकोजेनची (carbs) पातळी कमी होते. रिकाम्या पोटी कार्डिओ करताना सर्व ऊर्जा चरबीमधून येते, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.
- जर आपण दररोज वीस मिनिटे धावलात तर आपल्यासाठी यापेक्षा चांगला व्यायाम नाही, परंतु धावण्याबरोबरच तुमची तग धरण्याची क्षमताही (Stamina) वाढते.
- कार्डिओ करतेवेळी आपल्याला जितका अधिक घाम येईल तितक्या जास्त प्रमाणात चांगले सुखकारक वाटणारे हार्मोन्स शरीरातून स्रवतात.
- काही लोकांना रिकाम्या पोटी कार्डिओ करण्यामुळे उत्पादकता कमी झाल्याचे जाणवते पण हे रक्तप्रवाहातील ग्लूकोजच्या कमी पुरवठ्यामुळे होऊ शकते.
- बॉडीबिल्डर्सनी रिकाम्या पोटी कार्डियो कधीच करू नये कारण असे केल्यास त्यामुळे शरीर प्रथिने बनवणे ब्लॉक्सना बर्न करू शकते ज्यामुळे आपल्या स्नायूंवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून आपण रिकाम्या पोटी कार्डिओ करावा की नाही हे आपल्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे.