रेमडीसीवीरचे वितरण रूग्णालयातील गंभीर रुग्ण व आवश्यकतेनुसार न्यायिक पद्धतीने सुरू

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हयामध्ये सध्याच्या कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे वॉर रुमची स्थापना करण्यात आलेली आहे. रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या टंचाई अनुषंगाने  उस्मानाबाद जिल्हयातील रेम्डेसिवीर इंजेक्शनची विक्री करणा-या घाऊक/ठोक वितरकाकडे उपलब्ध होणारा साठा हा जिल्हा प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली कोव्हीड हॉस्पीटल्स व त्यांच्याशी सलंग्न मेडीकल स्टोअर्स यांना वितरीत करण्यासाठी व या बाबीचे संनियंत्रण करणेसाठी  समिती गठीत केलेली आहे.

औषध निरिक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग उस्मानाबाद यांचेकडुन  प्राप्त माहिती आधारे उस्मानाबाद जिल्हयामध्ये उपलब्ध असलेला रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा व हॉस्पीटलनिहाय व्हेंटीलेटर व आयसीयुमध्ये ॲडमीट असलेल्या पेंशटची संख्या विचारात घेवून उपलब्ध रेम्डेसिवीर इंजेक्शन साठा हा न्यायीक पध्दतीने जिल्हयातील  कोविड हॉस्पीटल यांना वितरीत करण्यात येतो. 

      आज घडीला कोव्हीड वॉर रुममध्ये रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या काळया बाजाराबाबत एकही तक्रार प्राप्त  झालेली नाही.  तथापि  दिनांक- 06.05.2021  रोजी दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये उस्मानाबादमधील वादग्रस्त हॉस्पीटल मधुन रेम्डेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असलेबाबत बातमी प्रकाशित झालेली आहे.

त्याअनुषंगाने  सर्व जनतेस कळविण्यात येते की,  भारत सरकारच्या Ministory of Chemicals & Fertilizers Department of Pharamaceuticals National Pharmaceutical pricing Authority विभागाने रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या किंमती बाबत खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

 

Sr No.

Name of the Company

Brand Name

Earlier MRP (Rs.)

Revised MRP (Rs.)

1.

Cadila Healthcare Ltd.

REMDAC

2800/-

899/-

2.

Syngene International Ltd.

(Biocon Biologics India)

RemWin

3950/-

2450/-

3.

Dr. Reddy’s Labouratories Ltd.

REDYX

5400/-

2700/-

4.

Cipla Ltd.

CIPREMI

4000/-

3000/-

5.

Mylan Pharmaceuticals Pvt. Ltd.

DESREM

4800/-

3400/-

6.

Jubilant Generics Ltd.

JUBI-R

4700/-

3400/-

7.

Hetero Healthcare Ltd.

COVIFOR

5400/-

3490/-

 

उपरोक्त नमुद तक्त्यामध्ये दर्शविलेल्या किंमतीपेक्षा कोणी चढया दराने कोविड-19 रुग्णांना/ नातेवाईकांना रेम्डेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असतील तर संबंधितांनी औषध निरिक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग उस्मानाबाद व  पोलीस उपअधिक्षक कार्यालय, उस्मानाबाद  यांचेकडे लेखी तक्रार नोंदवावी असे आवाहन  प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तक्रारदाराचे नाव, पत्ता इ. माहिती गोपनिय ठेवण्यात येईल. संपर्क क्रमांक :-1) श्री. विलास दुसाने, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद  - मो. क्र. 9867302218 2) श्री. मोतिचंद राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद  - मो. क्र.  9823108086  असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नोडल  ऑफीसर रेम्डेसिवीर वितरण, महेंद्रकुमार कांबळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.