काय सांगता ? मोठ्या हसण्याने देखील पसरतो कोरोना ...

 
एम्स-आयसीएमआरची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर


  आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे जगभरातील 19 ,000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि मोठ्या संख्येने लोक कोरोना संक्रमणाच्या भीषणतेतून जात आहेत. कोरोनाचा वाढता विनाश लक्षात घेतात्याच्या प्रसाराच्या सर्व कारणांवर सतत संशोधन केले जात आहे. त्यातच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) यांनी संयुक्तपणे त्यांच्या नवीन संशोधनावर आधारित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या मोठ्याने हसण्यामुळेही कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका असतो.

एका  नवीन  संशोधनात असे सूचित  केले  आहे  की, कोरोना विषाणू हा संक्रमित व्यक्तीच्या मोठ्याने हसण्याद्वारे देखील निरोगी लोकांना असुरक्षित बनवू शकते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या डॉक्टरांच्या सहकार्याने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

संशोधकांनी  अहवालात सांगितले आहे  की, संक्रमित लोकांच्या मोठ्याने हसण्यामुळे देखील कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका असू शकतो. खरेतर कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मोठ्या हास्याच्या वेळीविषाणूच्या थेंबाद्वारे हा व्हायरस इतर ठिकाणी  जाऊन पडतोत्यामुळे आजूबाजूची माणसे कोरोनाच्या तावडीत सापडले जाण्याची शक्यता असते. अशाप्रकारे मोठ्या हास्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. विशेष म्हणजे चीनमधील तज्ज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, मानवी विष्ठेमध्ये कोरोना विषाणू अनेक आठवडे जिवंत राहू शकतो. या संशोधनाचा निकालापाठोपाठ बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी देखील याबाबत ट्विट केले आहेत.

शिंकल्यावर आपल्या चेहऱ्याला स्पर्श करु नका
एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अंबुज रॉय म्हणाले की, खोकला आणि शिंका येणे दरम्यान कोरोना विषाणू हे थेंबाच्या वाटे वाहून येतात म्हणून हाताने तोंडाला स्पर्श करणे टाळा. तसेचजेव्हा संक्रमित व्यक्ती मोठ्याने हसते तेव्हा व्हायरस देखील बाहेर येतो व पसरू शकतो.

घराच्या फरशीची साफसफाई करणे महत्वाचे
जेव्हा कुणी शिंकते किंवा खोकते तेव्हा त्याचे थेंब फरशीवर पोहोचू शकतात आणि ते कित्येक तास सक्रिय राहतात म्हणूनच कुणालाही एखाद्याच्या संपर्कात येताना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. यासाठीच घरची फरशीटेबल पृष्ठभाग इत्यादी क्लिनर किंवा साबणाने वारंवार धुणे आवश्यक असते.

पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात धुवा
सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, कोरोना विषाणू हा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, संक्रमित होत असतो. त्याच्या संक्रमणाच्या पद्धती मात्र भिन्न असू शकतात. अशा परिस्थितीत अज्ञात किंवा संशयास्पद पृष्ठभागास स्पर्श करताना हात धुवा किंवा स्वच्छ करा.

  मद्यपान आणि धूम्रपान टाळा
तुम्हाला कोरोना विषाणूपासून होणारे संक्रमण टाळायचे असेल तर अल्कोहोल आणि धूम्रपान करणे त्वरित थांबवा कारण या दोघांचे सेवन केल्यास एखाद्या व्यक्तीची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत जेव्हा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या जाळ्यात अडकलात तर दुप्पट समस्या उत्पन्न होते तेव्हा संकटाशी सामना करणे अवघड जाईल.

रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मीठाचे सेवन कमी करावे
तज्ञ म्हणतात की, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव आणि धोक्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, विशेषत: उच्च रक्तदाब रूग्णांनी त्यांच्या जेवणातील मीठ कमी करावे.

काही   प्र तिबंधात्मक उपाय वाचा

  • जीवनमान चांगले ठेवा.
  • मॉर्निंग वॉक करू शकता, गच्चीवर चालता येते.
  • जर घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क वापरणे खूप महत्वाचे आहे
  • जर आपल्याला ताप, खोकला किंवा डोकेदुखी असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • जेव्हा ताप आणि खोकला एकत्रित होतो तेव्हा तत्काळ स्वत:ला घरातील इतर सदस्यांपासून वेगळे ठेवा.