स्थानिक कमिशनखोर लोकप्रतिनिधीची राणा दादाबद्दल पोटदुखी असल्याने टीकाटिप्पणी - मल्हार पाटील
उस्मानाबाद - स्थानिक कमिशनखोर लोकप्रतिनिधीची राणा दादाबद्दल पोटदुखी असल्याने टीकाटिप्पणी करीत आहेत , असा पलटवार युवा नेते मल्हार पाटील यांनी केला आहे.
खरीप २०२० चा पीक विमाबाबत आजपर्यंत आवाज कुणी उठवला, न्यायालयात याचिका दाखल कोण केली, हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना माहिती आहे. राणा दादाबद्दल शेतकरी खुश असताना स्थानिक कमिशनखोर लोकप्रतिनिधीची पोटदुखी वाढली असून चवताळ्यासारखे टीकाटिप्पणी करत आहेत.
राणा दादाला ओपन चॅलेंज करण्याची यांची लायकी नाही. कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्या सोबत त्यांनी बैठक घ्यावी, त्यात राणा दादा सडेतोड उत्तर देतील, असेही मल्हार पाटील यांनी प्रतिआव्हान दिले आहे.