महाविकास आघाडीची सरशी , भाजपला भोपळा 

उस्मानाबाद डीसीसी बँक निवडणूक उस्मानाबाद डीसीसी बँक निवडणूक 
 

<a href=https://youtube.com/embed/oyHi62b-B2U?autoplay=1><img src=https://img.youtube.com/vi/oyHi62b-B2U/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640"> उस्मानाबाद -  पाच जागा बिनविरोध जिंकलेल्या महाविकास आघाडीने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक ( DCC Bank ) निवडणुकीत उर्वरित दहा जागा जिंकून बाजी मारली आहे. या निवडणुकीत  भाजपला भोपळाही फोडता आला नाही. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्ता मिळविणे आवाहन नव्हते. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत गोटात दुफळीची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे उर्वरीत जागांसाठी काय होते, याकडे लक्ष वेधले होते. 


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार मधुकर चव्हाण विरुध्द भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील अशी लढत होती. सुरुवातीला हि निवडणुक बिनविरोध होईल असे वाटत होते परंतु चर्चा निष्फळ ठरल्याने हि निवडणुक लागली होती.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ५ उमेदवार हे बिनविरोध आले होते. तर, उर्वरित १० जागासाठी २२ उमेदवार निवडणुक लढवत होते. महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे १० जागांवरील उमेदवार विजयी झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या दिवाळखोरीत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही  बँकेत पैसा नाही. अनेक लोकांच्या ठेवी अडकल्या आहेत. पडक्या वाड्याची पाटीलकी  मिळवण्यात महाविकास आघाडीला यश आले असले तरी बँक पुन्हा उर्जितावस्थेत आणणे मोठे आव्हान आहे. 

सत्तेतील दोन माजी मंत्री,एक खासदार, तीन आमदार,दोन माजी आमदार एकत्र आल्याने पराभव 

rana सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपा विरोधात लढावं लागलं, यातच सर्व काही आलं. दोन माजी मंत्री,एक खासदार, तीन आमदार,दोन माजी आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षातील एकत्रित  येऊन लढले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्या सारखी होऊ नये, यासाठी निवडणूक लढविली. 

 लोकशाहीमध्ये मतदार सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. पराभवाची कारणमीमांसा व निकालाचे आत्मचिंतन करू.राज्यात सत्तेत असतानाही मागील दोन वर्षांपासून थकहमीचे पैसे यांना आणता आले नाहीत. बँकेला एक रुपयाचीही मदत सरकारकडून आणू शकले नाहीत. निदान आता तरी थक हमीचे पैसे आणतील अशी आशा करतो.

- आ. राणा जगजितसिंह पाटील , भाजप नेते