पत्रकार सुनील ढेपे यांना 'संपादक रत्न' पुरस्कार जाहीर

 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद लाइव्ह आणि पुणे लाइव्हचे संपादक  सुनील ढेपे यांना  महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय " संपादक रत्न " ( डिजिटल मीडिया ) पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा राज्याध्यक्ष प्रा. विलासराव कोळेकर सर यांनी आज केली आहे. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार शिर्डी येथे येत्या २९ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त सुनील ढेपे यांचं " डिजिटल मीडिया" वर व्याख्यान देखील होणार आहे.

नोंदणीकृत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. सन २००५ मध्ये आटपाडी ( जि. सांगली ) येथे झालेल्या वार्षिक अधिवेशात  सुनील ढेपे यांना  " पत्रकार  रत्न " पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता याच संघाच्या वतीने  राज्यस्तरीय "संपादक रत्न"  ( डिजिटल मीडिया ) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ढेपे यांचे डिजिटल मीडियावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे.

पत्रकार सुनील ढेपे हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे अनेक वार्तापत्र तसेच शोध वार्ता गाजल्या आहेत. एक निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच त्यांना अप्रतिम मीडियाचा राज्यस्तरीय 'चौथा स्तंभ'  विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. एकाच महिन्यात त्यांना दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.

d


पत्रकार सुनील ढेपे यांना यापूर्वी लोकमतचा  पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९० ), अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९२ ) कै. नागोजी दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ( २०१६ ), पत्रकार कल्याण निधीचा कै . बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार ( २००६ ) , समर्थन संस्था ( मुंबई ) चा मानवी हक्क वार्ता पुरस्कार ( २००६ ) पुणे प्रेस क्लबचा युवा पत्रकारिता पुरस्कार ( दोन वेळा ) असे  ३० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.