सक्तीची वीज वसुली बंद करा 

भाजपचा अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर चक्का जाम 
 

उस्मानाबाद  - सक्तीची वीज वसुली बंद करावी व वीज पुरवठा खंडीत करु नये , या मागणी साठी आ.राणाजगतिजसिंह पाटील  यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज  अधीक्षक  अभियंता यांच्या कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन केले.  ट्रॅक्टरद्वारे  प्रवास करत शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले.

शिवसेनेच्या नेतृत्वातील महावसुली सरकारने सावकारापेक्षा जाचक पध्दतीने बळीराजाला ऐन रब्बी हंगामात वेठीस धरून वीज पुरवठा खंडित करत वसुलीचा तगादा लावला आहे. बहुसंख्येने आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तीव्र रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सक्तीची वसुली बंद करुन कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत न करण्याची मागणी केली होती परंतू या बाबतचे आदेश न झाल्यामुळे आज महावितरण कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी शेतकऱ्यांची आर्थीक परिस्थिती महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराठवाडा विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक  गोंदवलेकर, मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या निदर्शनास आणुन दिली. खरीपाची पीके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही, पीक विम्याचे पैसे देखील अद्याप मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांकडे पीक विम्याच्या माध्यमातुन समाधानकारक पैसे आल्यास या मधुन शेतकरी वीज बील भरतील, तुर्तास वीज जोडणी पुर्ववत करुन यापुढे वीज पुरवठा खंडीत न करण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी केली. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडून त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आग्रह धरला. 

आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष  नितीन काळे म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकार व महावितरणला आजच्या माध्यमातून हा निर्वाणीचा इशारा आहे. त्यांनी भूमिका बदलली पाहिजे. सरकारने सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, मात्र सरकार सावकाराची भूमिका घेत आहे. त्यामुळे शासनाने त्यांची भूमिका बदलावी अन्यथा पुढील काळात याही पेक्षा तीव्र आंदोलन करून सरकारला 'सळो कि पळो' केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम दिला. 

बुद्धिजीवी प्रकोष्ठ विभागाचे प्रदेश संयोजक दत्ता भाऊ कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाले कि, देवेंद्रजी भारनियमन बंद केले होते, यांनी वीजच बंद केली. शेतकऱ्यांच्या या महत्वपूर्ण विषयाकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अपेक्षित होत, मात्र ते अन्य कामातच व्यस्त आहेत.    

आंदोलनाची दखल घेत व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने मुख्य अभियंता यांनी यापुढे वीज तोडणी थांबविण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम उपलब्ध झाल्यानंतर वीज बील भरण्याच्या अटीवर बंद केलेले सब स्टेशन सुरु करण्याचा शब्दही दिला. सोमवारी या बाबतचा आढावा घेऊन मंगळवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काय भूमिका घ्यायची हे ठरणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांनी दिली. 

शेतकऱ्यांप्रती पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या सरकारकडुन हीच अपेक्षा होती.  यावेळी महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत, महावितरण च्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनास यश मिळाले असुन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या जाम चक्का आंदोलनात जिल्हा संयोजक नेताजी पाटील, जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन कैलास शिंदे, संचालक सतीश दंडनाईक, भारत डोलारे, राहुल पाटील सास्तूरकर, सुधाकर गुंड गुरुजी, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, तालुकाध्यक्ष सर्वश्री राजाभाऊ पाटील, संतोष बोबडे, अजित पिंगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे, विजय दंडनाईक, रामदास कोळगे, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, जि.प.सदस्य राजकुमार पाटील, नाना वाघ, राजाराम कोळगे, विक्रम देशमुख, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष निहाल काझी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, युवती मोर्चा जिल्हाध्यक्षा पूजा राठोड, पूजा देडे, विद्या माने, बाजार समिती चेअरमन दत्तात्रय देशमुख, खरेदी विक्री संघ चेअरमन अनंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, पं. स. तुळजापूर सभापती इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, पं.स.उस्मानाबाद उपसभापती प्रदीप शिंदे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, प्रशांत लोमटे, संजय लोखंडे, ओम मगर, व्यंकट पाटील, आनंद कंदले, गणेश सोनटक्के, वसंत वडगावे, दत्ता सोनटक्के, प्रभाकर मुळे, पांडुरंग लाटे, अभिराम पाटील, सिद्धेश्वर कोरे, इंद्रजीत देवकते, सतीश देशमुख, पांडुरंग पवार, साहेबराव घुगे, अरविंद पाटील, सुहास साळुंके, झुंबर बोडके, गजानन नलावडे, प्रमोद देशमुख, प्रवीण पाठक, माधव पवार, युवराज ढोबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.