अणदूर परिसरात अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले ... 

कृषी अधिकारी, तलाठी आणि विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर 
 

अणदूर  - तुळजापूर तालुक्यातील अणदूर  परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन हातचे गेले आहे. त्याचे प्रत्यक्ष पंचनामे आजपासून सुरु झाले आहेत.

 कृषी अधिकारी पी.आर. पवार मॅडम, तलाठी विलास कोल्हे, विमा प्रतिनिधी सोपान सुरवसे, मछिंद्र सुरवसे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलाठी कार्यालयातील कर्मचारी  मल्लू मुळे, तसेच शेतकरी रमेश घोडके, अमोल मोकाशे, सुदर्शन मोकाशे, दीपक मोकाशे आदी  उपस्थित होते.

अणदूर परिसरात सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले आहे. काढणीला आलेले सोयाबीन हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल आहेत. 

अणदूर परिसरात गतवर्षीही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.  गतवर्षी ९५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळालेला नाही. यंदा तरी विमा मिळेल अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन नुकसानीचा फॉर्म भरला आहे, त्यांच्या शेतावर विमा प्रतिनिधी भेट देऊन पाहणी करीत आहेत. रँडम पद्धतीने पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.