निम्न तेरणा नदी काठच्या परिसरात धोक्याचा इशारा

 

उस्मानाबाद - निम्न तेरणा धरण परिसरात पावसाची संततधार धार कोसळत असल्यामुळे माकणी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेरणा नदी काठच्या गावांना अतिदक्षता इशारा देण्यात आला आहे.

दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी ६०३.४० मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७१.४५ टक्के आहे. त्यातच हवामान खात्याने या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची वर्तवली आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे धरण निर्धारित पातळी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


तर त्यानंतर धरणात येणारे पाणी तेरणा नदीमार्गे सोडावे लागणार असल्यामुळे तेरणा नदी काठावरील शेतकरी किंवा नदी काठी वस्ती करून राहिलेले नागरीक यांनी सावध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवित व वित्त हानी तळल्यास मदत होणार असून या भागातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे