थंडीच्या लाटेमध्ये जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद -  अतिवृष्टी सोबत उद्भवणाऱ्या थंडीच्या लाटे मध्ये आर्दता व थंडी या दुहेरी आपत्तीस पशुधनास तोंड द्यावे लागते. या आपत्ती पासून गाई, म्हैस, मेंढ्या आणि शेळया यांचा बचाव करून शेतकरी व पशुपालक यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात,असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.

         पशुधनास बंदिस्त जागेत बांधण्यात यावे. गोठ्याच्या,निवाऱ्यास उघड्या भागावर कापडी अथवा प्लॅस्टीकच्या शोटद्वारे झाकावे जेणे करून त्यांचा पाऊस व थंडी पासून बचाव व्हावा.बंदिस्त निवारा उपलब्ध नसल्यास खळयावरील धान्य किंवा कडब्याच्या गंजी झाकण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टीकच्या शीट मेंढ्या व शेळयांवर झाकावे, पावसामुळे अथवा थंडी मुळे जमिनीचे तापमान कमी झालेले असते. त्यात ओलसर पणा हो असतो.

      यापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी कोरडा चारा अथवा भुसा याचे अच्छादन जमिनीवर करावे. शक्य असल्यास पशुधनाच्या आजूबाजूस शकोटी करावी. जाळ लागून नुकसान होणार नाही. याची दक्षता घ्यावी.स्थलांतर करणाऱ्या आणि रानात मेंढ्या व शेळयांच्या बसवणाऱ्या कळपांचे पशुपालक यांनी पावसाची सततधार अथवा कडाक्याची थंडी असल्यास विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो मेंढ्या व शेळयांना बंदिस्त उबदार निवारा मिळेल,याची दक्षता घ्यावी. पशुधनास कोरडा चारा द्यावा. स्वच्छ पाणी पिण्यास परवावे.पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बहायड्रट खाद्य प्राधान्याने द्यावे. ज्या द्वारे शरीरात लवकर उर्जा उत्पन्न ईल.

    तथापि, अॅसिडोसिस होणार नाही याची दक्षता घ्यावी.पशुधनास गुळ टाकुन घुगऱ्या,कण्या (पेज/कांजी) पातळ व कोमट झाल्यास द्यावयात जेणे करून पशुधनाच्या शरीरास उष्णता, उर्जा मिळेल. तथापि जास्त मात्रा देऊ नये अॅसिडोसीस होण्याचा धोका असतो.

       या आपत्तीच्या वेळी मेंढ्यांची लोकर कातरणी थांबवावी. वातावरणात योग्य बदल झाल्यास परत लोकर कातरणी सुरू करण्यास हरकत नाही.या काळात पशुधनास आजारपणापासून वाचविण्यासाठी घटसर्प रोग प्रतिबंधक लस प्राधान्याने द्यावी.अतिथंड वातावरणामुळे हायपोथर्मिया,अपचन,न्युमोनिया या आजारास पशुधन बळी पडू शकते.यासाठी कॅल्शियम बोरोग्लुकोनेट (काळजीपूर्वक वापरावे), डेक्झामिझोन (गर्भधारणा झालेल्या पशुधनात आवश्यक असल्यासच कमी डोसेस मध्ये वापराव), डेक्सट्रोज, लिव्हर टॉनिक, जिवनस्ल्ने यांचा वापर करता येईल.

      पशुधनाच्या खुरांना अंटीसेप्टीक सोल्युशन लावावत जखमा असल्यास त्यांची ड्रेसिंग करावी.पशुधनास शरीराच्या नॉर्मल तापमानाच्या एवढे उष्ण (कोमट) पाणी पिण्यास द्यावे.     

       थंड पाणी दिल्यास हायपोथर्मिया, न्युमोनिया होण्याचा धोका असतो.न्युमोनिया किंवा श्वसनसंस्थेचे आजार असल्यास प्रतिजैविके व थिओफायलीन,डेक्झामिथेझोन (गर्भधारणा झालेल्या पशुधनात आवश्यक असल्यासच कमी डोसेस मध्ये वापरावे) यासारखी औषधी गरजेनुसार वापरता येतील.