पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडून पीक विमा कंपनीला नोटीस पाठविण्याची सूचना

 

उस्मानाबाद -  सन २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जम होईपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आ. कैलास पाटील यांनी घेतली असून, चौथ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान  राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  आणि पालकमंत्री डॉ.सावंत यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही केली आहे.

 
 खरीप 2020 साठी पीक विमा कंपनी यांना वारंवार सूचना देऊनही कंपनीने 574 कोटी रुपये निधी जमा केलेला नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

           खरीप 2021 साठी 374 कोटी रुपये कंपनीला वारंवार सूचना देऊन देखील जमा केलेले नाहीत, त्यासंदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

            राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाकडे 200 कोटी रुपयाचा निधी जमा होण्याची शक्यता असून ती निधी जमा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या समप्रमाणात तात्काळ वाटप करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना सूचित केले आहे.