वाशी : अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

वाशी: भिमाशंकर मधुकर माने, रा. इंदापुर, ता. वाशी हे दि. 29 एप्रील रोजी 13.30 वा. सु. आपल्या राहत्या घरी एकुण 3,780 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) विक्रीच्या उद्देशाने बाळगला असतांना अन्न सुरक्षा पथकास आढळले. यावरुन अन्न सुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 हस अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन अधिनियम कलम- 2, 3, 4, 59 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीच्या दोन घटना 

वाशी: दिलीप गोरोबा गवळी, रा. पिंपळवाडी, ता. वाशी यांच्या शेतातील गोठ्यातील एक म्हैस दि. 28- 29 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिलीप गवळी यांनी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  राज्य परीवहन महामंडळाच्या उस्मानाबाद येथील आगारात असलेल्या बस क्र. एम.एच. 20 बीएल 0306 ची लिओगार्ड कंपनीची बॅटरी (किं.अं. 7,000 ₹ ) दि. 19- 29 एप्रील रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या परीवहन आगार कार्यशाळेचे अधिक्षक- विनोद आलकुंटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

 वाशी: विलास देवराव काळे, रा. सरमकुंडी, ता. वाशी हे 29 एप्रील रोजी सरमकुंडी फाटा येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) बाळगलेले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

 नळदुर्ग: दत्ता हेमा चव्हाण, रा. देवसिंगा (नळ) तांडा, ता. तुळजापूर हे 29 एप्रील रोजी राहत्या घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 5 बाटल्या व एका कॅनमध्ये 11 लि. गावठी दारु (किं.अं. 810 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.