अटक आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त

 

उस्मानाबाद -  वाशी पो.ठा. येथील दरोडा, चोरी अशा तीन गुन्ह्यात स्था.गु.शा. च्या पथकाने आरोपी- अनुज गणेश भोसले, वय 21 वर्षे, रा. डोकेवाडी, ता. भूम यास मुद्देमालासह दि. 22.05.2021 रोजी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपासादरम्यान स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- घुगे, पोना-  हुसेन सय्यद, बबन जाधवर, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने अटक आरोपी- अनुज भोसले याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातून प्रत्येकी एक होंडा शाईन मोटारसायकल चोरल्या असून त्यावरुन वाशी पो.ठा. व नेकनूर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार गुन्हे दाखल असल्याचे समजले. यावरुन पथकाने आज दि. 24 मे रोजी नमूद गुन्ह्यातील दोन्ही मोटारसायकल त्याच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.


जुगार विरोधी कारवाया

बेंबळी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन बेंबळी पो.ठा. च्या पथकाने दि. 23 मे रोजी बेंबळी येथे छापा मारला. यावेळी बेंबळी येथील अंबाबाई मंदीरामागील झाडाखाली 1)बालाजी पारडे 2)शरद गिरी 3)तानाजी तेलगावकर 4)श्रीशैल्य वैद्य, सर्व रा. बेंबळी हे तिरट जुगार खेळण्याच्या उद्देशाने तिरट जुगार साहित्य व 2,150 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना पथकास आढळले.

आंबी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन आंबी पो.ठा. च्या पथकाने दि. 23 मे रोजी आंबी येथे छापा मारला. यावेळी आंबी येथील देवगाव रस्त्याच्या बाजूच्या एका शेततळ्याजवळील झाडाखाली 1)परमेश्वर शेजाळ 2)आण्णा वाघमारे 3)बालाजी गटकळ 4)रविंद्र गलांडे 5)नितीन उबाळे 6)अक्षय मारे 7)बजरंग डुकळे 8)समाधान गटकळ 9)सागर भोसले 10)मुरली भोसले, सर्व रा. आंबी 11)समाधान सरवदे, रा. गोसावीवाडी, ता. भुम हे सर्वजण तिरट जुगार खेळण्याच्या उद्देशाने तिरट जुगार साहित्य व 3,360 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना पथकास आढळले.

अवैध मद्य विरोधी कारवाया

उस्मानाबाद -  उस्मानाबाद पोलीसांनी काल रविवार दि. 23 मे रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 4 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 4 गुन्हे नोंदवले आहेत.

संदीप जाधव, रा. तीर्थ (बु.), ता. तुळजापूर हे तीर्थ (बु.) शिवारातील ‘ओंकार ढाबा’ मध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 3,200 ₹) बाळगलेले तर उद्देश मस्के, रा. देवसिंगा (तुळ), ता. तुळजापूर हे देवसिंगा (तुळ) शिवारात एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु (किं.अं. 300 ₹) बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

प्रकाश चव्हाण व बालाजी पवार, दोघे रा. लमाण तांडा, आलुर, ता. उमरगा हे दोघे वस्तीवरील कुनसावळी रस्त्यालगत वेगवेगळ्या दोन ठिकाणी अनुक्रमे 9 लि. व 9 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 1,650 ₹) बाळगलेले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.