उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जखमी
उमरगा : कोळसुर (क.) येथील विठ्ठल मदन पाटील, वय 30 वर्षे हे दि. 28 जुलै रोजी गाव शिवारातील रस्त्याने पायी जात असतांना माळेगाव येथील आकाश शिंदे याने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीजे 1835 ही निष्काळजीपने चालवून विठ्ठल पाटील यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या विठ्ठल पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : शिंदेवाडी येथील लहु अंबादास मगर, वय 52 वर्षे, हे दि. 20.05.2021 रोजी रात्री 03.45 वा. घरासमोरील रस्त्यालगत झोपलेले होते. यावेळी केशेगाव ग्रामस्थ- हनुमंत सुभाष कोळगे यांनी ट्रॅक्टर क्र. एच.एच. 25 एएस 4293 हा निष्काळजीपने चालवल्याने ट्रॅक्टरचे चाक लहु मगर यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या छाती- पोटास गंभीर दुखापत झाली. अशा मजकुराच्या लहु मगर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.