दोन आरोपींस प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा

 

उस्मानाबाद -  कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन व कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम-  269 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज दि. 20 जुलै रोजी खालील प्रमाणे शिक्षा सुनावल्या. 

यात आनंदनगर पो.ठा. हद्दीत नमूद कलमाचे उल्लंघन करणारे 1) सिध्दीकी इस्माईल शेख, रा. रामनगर, उस्मानाबाद यांना 500 ₹ दंड व दंड न भरल्यास तीन दिवस साध्या कारावासाची शिक्षा तर उस्मानाबाद (श.) पो.ठा. हद्दीत नमूद कलमाचे उल्लंघन करणारे 2) इसाखॉ महेबुबखॉ पठाण, रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद यांना 500 ₹ दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


कोविड- 19: दि. 19.07.2021 रोजी 8 पोलीस कारवायांत 1,600 रु दंड वसुल

 
 उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 19.07.2021 रोजी कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 02 कारवायांत 400/-रु. दंड वसुल.

2)सार्वजनिक स्थळी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 06 कारवायांत 1,200/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.