उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

मुरुम : रमाकांत मल्लिकार्जुन हावळे, रा. आलुर ता. उमरगा हे दि. 15.04.2021 रोजी 13.30 वा. शेतात होते. यावेळी भावकीतील- प्रकाश, विरु, प्रशांत, अंबादास, शिवा, नागेश हावळे, यांनी मिळुन शेत नांगरणीच्या करणावरुन रमाकांत यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच यशवंत हावळे, गौतम हावळे, हे भांडण सोडवित असतांना त्यांना पण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या रमाकांत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मुरुम : प्रकाश गणपती हावळे, रा. आलुर ता. उमरगा हे दि. 15.04.2021 रोजी 11.30 वा. शेतात होते. यावेळी भावकीतील- यशवंत, मुकुंद, बसवराज, रमाकांत, बाळु, गौतम, अनिकेत, मल्लिकार्जुन  हावळे, यांनी मिळुन शेत वाटणीच्या करणावरुन प्रकाश यांना शिवीगाळ करुन, लाकडाने व हातोडीने मारुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मल्लय्या व प्रभावती हावळे, हे भांडण सोडवित असतांना त्यांना पण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या प्रकाश यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

उस्मानाबाद- सांजा रोड, भवानी चौक, उस्मानाबाद येथील गिरीष नारायण पिंपळे यांची हिरो होंन्डा मो. सा. क्र. एम. एच. 13 एई 0531 ही 04 ते 05 एप्रिल रोजीच्या दरम्यान राहते घरासमोरुन  अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गिरीष पिंपळे यांनी 15 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्थागुशा पथकाने 15 एप्रील रोजी 14.50 वा. सिंदगाव ता. तुळजापुर येथे छापा टाकला असता जाफर अमीर शेख रा. सिंदगाव  हे अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या  96 बाटल्या व बिअरच्या 12 बाटल्या बाळगल्या असतांना आढळले.

 
 ढोकी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पोलीसांनी 15 एप्रील रोजी 17.10 वा. दाउतपुर गावात छापा टाकला असता महादेव कालीदास दोनगहु हा घरासमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 13 बाटल्या बाळगला असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी नमुद मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदयांतर्गत 2 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांत नोंदवले आहेत.