तुळजापूर : मनाई आदेश झुगारुन दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

तुळजापूर: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन दादासाहेब नावडे यांनी दि. 22 मे रोजी 19.00 वा. सु. गावातील आपले किराणा दुकान व्यवसासायास चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोकॉ- अजितकुमार सोनवणे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


ब्रेक द चेन: दि. 22.05.2021 रोजी 975 पोलीस कारवायांत 2,18,600/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद -  लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 22.05.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 24 कारवायांत- 5,600/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 47 कारवायांत- 23,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 889 कारवायांत 1,79,800/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 15 कारवायांत 9,700/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.