चोरीच्या बकऱ्यांसह नळदुर्गमध्ये तिघे अटकेत 

 

उस्मानाबाद  - स्था.गु.शा. च्या पोनि- . गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- . निलंगेकर, पोउपनि- श्री. भुजबळ, पोहेकॉ- शेळके, पोकॉ- सावंत, ढगारे, कोळी, ठाकुर यांच्या पथकास गोपनिय माहिती मिळाल्यावरुन काल दि. 28 जुलै रोजी 1) बाळु सावंत 2) रावसाहेब कदम, दोघे रा. जळकोट 3) शफी शेख, रा. हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नळदुर्ग पो.ठा. हद्दीत बकऱ्या चोरी केल्यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 244 / 2021 हा तपासास असल्याचे समजले. नमूद तीघांच्या ताब्यातून या गुन्ह्यातील चोरी केलेल्या 13 बकऱ्यांसह बकऱ्या विक्रीतील 23,000 ₹ रोख रक्कम व चोरी करण्यास वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. अधिक चौकशी दरम्यान नमूद तीघांनी बकऱ्या चोरी संबंधी नळदुर्ग हद्दीतच गु.र.क्र. 21 / 2020, 374 / 2020, 42 / 2021 हे 3 गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरीत तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

कळंब - विशाल शामराव गाडे, रा. इंदिरानगर, कळंब यांनी त्यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 6284 ही दि. 25 जुलै रोजी 23.00 वा. सु. आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्याजागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विशाल गाडे यांनी दि. 28 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : नागनाथ रेवणप्पा कुंभार, रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा यांच्या लक्ष्मीपाटीजवळील खडी केंद्रावरील खोलीचे कुलूप दि. 25 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तोडून आतील क्रशर जॉक प्लेट- 10 नग, ब्रेकर रॉड, टॉगल प्लेट, टॉगल बेरिंग व जुने वारपरते लोखंडी साहित्य असे एकुण 53,300 ₹ चे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या नागनाथ कुंभार यांनी दि. 28 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.