वाशी नाकाबंदी दरम्यान दरोड्याच्या तयारीतील तीन आरोपी अटकेत 

 

 वाशी: वाशी पो.ठा. चे पोनि अजीनाथ काशीद हे पथकासह दि. 06.06.2021 रोजी 22.30 वा. पो.ठा. हद्दीतील महामार्गावर गस्त व नाकाबंदी करत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील इंदापूर फाटा- खानापुर फाटा दरम्यान काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसत आहेत. 

यावर पथकाने तेथे जाउन खात्री केली असता त्या ठिकाणी 1)सुनिल भागवत काळे 2)सुनिल नाना काळे, दोघे रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा 3)सुरज लिंबाजी शिंदे, रा. मांडवा हे तीघे मोटारसायकलसह आढळले तर इतर दोघे पोलीसांची चाहूल लागताच पसार झाले. पथकाने वाहनांसह नमूद तीघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात लोखंडी कोयता, विळा, लोखंडी गज असे साहित्य आढळले. त्या ठिकाणी हजर असल्याबाबत त्यांना विचारपुस केली असता ते पोलीसांना समाधानकारक माहिती देउ शकले नाहीत.

यावर ते सर्व महामार्गावरील वाहनांवर दरोडा टाकण्याच्या किंवा लुटमार करण्याच्या तयारीने एकत्र जमले असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्या तीघांना नमूद साहित्य व मो.सा. सह ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 399, 402 अंतर्गत गुन्हा नोदवला असून त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.


चोरीच्या केबलसह आरोपी ताब्यात

 उस्मानाबाद - स्वप्नील रविंद्र कचरे, रा. उस्मानाबाद यांच्या वाघोली येथील तलावातील जलसिंचन विद्युत पंपाची 91 मिटर केबल अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23.05.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेली होती. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 114 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

            गुन्हा तपासा दरम्यान उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. सूरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री अनिल टोंगळे, सपोफौ- किशोर रोकडे, पोना समाधान वाघमारे, माने यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करुन व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दादा लक्ष्मन पवार उर्फ चिलम्या, वय 26 वर्षे, रा. पारधी पिढी, वरुडा, ता. उस्मानाबाद यास काल दि. 07 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीचे केबल जप्त केले आहे.