पिंपळगांव ,दहिफळ, इटकळ येथे चोरीची घटना 

 

कळंब  : अभिजीत अनिल टेकाळे, रा. पिंपळगांव (डो.) येथील यांनी त्यांची टीव्हीएस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 5321 ही दि. 05 ऑगस्ट रोजी 21.30 वा. सु. आपल्या शेतातील घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मो.सा. त्यांना लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अभिजीत टेकाळे यांनी दि. 08 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : नारायण रावसाहेब मते व गंगाराम ढवळे, दोघे रा. दहिफळ, ता. कळंब या दोघांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 07- 08 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडून मते यांच्या घरातील 77 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आणि ढवळे यांच्या घरातील 125 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे दागिने- वस्तू, एक भ्रमणध्वनी व  75,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या नारायण मते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : इटकळ, ता. तुळजापूर येथील प्रशांत लकडे यांची घरासमोरील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 3415 व ग्रामस्थ- अजितकुमार पाटील यांच्या उघड्या घरातील 2 ग्रॅम वजनोच सुवर्ण दागिने व चांदीचे चैन- जोडवे तसेच गल्लीतील अंगनात झोपलेले शिवराज शिंदे, अविनाश शिंदे व आबाराव गोरे यांच्या उषाचे एकुण तीन भ्रमणध्वनी दि. 08 ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञाताने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या प्रशांत लकडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.