आलूर, दहिफळ, धनगरवाडी येथे चोरीची घटना 

 

मुरुम  : वजीर खासिम सय्यद, रा. आलुर, ता. उमरगा यांनी आलुर गट क्र. 1094 मधील आपल्या शेत गोठ्यासमोरील 25 अश्वशक्ती क्षमतेचे पुष्पक मळणीयंत्र दि. 06- 08 ऑगस्ट रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या वजीर सय्यद यांनी दि. 09 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा  : गंगाधर बापुराव ढवळे, रा. दहिफळ, ता. कळंब यांच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खोलीचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 08 ऑगस्ट रोजी 02.30 वा. सु. तोडून घरातील 185 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, चांदीचे दागिने, एक भ्रमणध्वनी व 75,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या गंगाधर ढवळे यांनी दि. 09 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : राजेंद्र डोंगरिबा सुर्यवंशी, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांच्या धनगरवाडी गट क्र. 77 / 1 मधील शेतातील  950 मीटर वीज केबल दि. 08- 09 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
पाच गुन्ह्यातील आरोपींस आर्थिक दंडाची शिक्षा

उस्मानाबाद -  कोविड- 19 संसर्ग होउ शकेल अशी निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे तामलवाडी पो.ठा. हद्दीत उल्लंघन केल्याने काटी ग्रामस्थ- तौफीक मुनीर कुरेशी व नवनाथ जगन्नाथ फुलसुंदर यांना प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी सुनावली. तर याच प्रकरणी परंडा पो.ठा. हद्दीतील आरिफ हसन देहलुज यांना 1,000 ₹ आणि प्रशांत भाग्यवान डुकरे यांना 500 ₹ दंडाची शिक्षा तसेच जाहीरातीस प्रतीबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि विवरण अधिनियम कलम- 6 (ब) चे उल्लंघन करणाऱ्या सज्जन आप्पाराव खर्चे यांना 200 ₹ दंडाची शिक्षा दि. 09 ऑगस्ट रोजी संबंधीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावल्या आहेत.