उस्मानाबादेत दोन ठिकाणी तर लोहाऱ्यात एका ठिकाणी चोरी 

 

लोहारा  : खंडू काशीनाथ रसाळ, रा. लोहारा (खु.) यांच्या शेतातील विहीरीवरील डिझेल पंप दि. 13- 14 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन रसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद  : कौडगाव, ता. उसमानाबाद येथील कैलास बिभीषण थोरात यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 24- 25 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडून आतील 50 ग्रॅम सुवर्ण दागिने, 215 ₹ रोख रक्कम, कपडे व तुपाचा डबा चोरुन नेला. अशा मजकुराच्या थोरात यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद : फिरोज शेख, रा. गालीबनगर, उस्मानाबाद यांनी त्‍यांच्या घरासमोर ठेवलेले ट्रक चाकाची लोखंडी तबकडी, लोखंडी पाटे इत्यादी जुने साहित्य दि. 24 ऑगस्ट रोजीच्या पहाटे अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 आगळीक

उस्मानाबाद  : सुरेश भावसार, रा. माणीक चौक, उस्मानाबाद यांची घराच्या व्हरांड्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 0714 ही दि. 24 ऑगस्ट रोजी रात्री 23.30 वा. सु. अज्ञाताने पेटवून भावसार यांचे आर्थिक नुकसान केले. यावरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.